यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाला सुरुवात; ड्युअल डिग्रीचा पर्याय उपलब्ध

 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाला सुरुवात; ड्युअल डिग्रीचा पर्याय उपलब्ध
यूजीसीने गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचे शिक्षण देण्याच्या सुविधा उपलब्ध करण्याबाबत देशातील विद्यापीठांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, देशातील विविध विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांसाठी ड्युअल डिग्रीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे एकाच वेळी विविध अभ्यासक्रमातील पदवी मिळवणे आता विद्यार्थ्यांना शक्य झाले आहे. शिवाय घराची परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे कॉलेजला उपस्थित राहू न शकणाऱ्या विसद्यार्थ्यंनासाठी मुक्त विद्यापीठ वरदान ठरत आहेत. अशात, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रवेशना सुरुवात झाली असून, इथून विद्यार्थी ड्युअल डिग्री मिळवू शकतात.

आता पारंपारिक विद्यापीठाच्या पदवी सोबतच मुक्त विद्यापीठाची पदवीही मिळवणे सहज शक्य झाले आहे. इतकेच नव्हे तर, तुम्ही शिकत असलेल्या एखाद्या विद्यापीठातील अभ्यासक्रमाबरोबर यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी(Degree), पदविका (Diploma) किंवा प्रमाणपत्र स्तरावरील (Certificate Courses) करता येणार आहेत.

यासाठी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु झाले असून. यात पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका, प्रमाणपत्र शिक्षण (सर्टिफिकेट कोर्स) इत्यादी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये दूरस्थ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इथल्या विविध अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना ३० जुलै २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भारत येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठात प्रवेश अर्ज भरण्यासाठी :
  • त्यांनतर मिळालेल्या आयडी आणि पासवर्ड चा वापर करून आपल्या खात्यात प्रवेश करावा.
  • आपली संपूर्ण प्रोफाइल व्यवस्थित भरावी.
  • सर्व डॉक्युमेंटस अपलोड करावेत. तद्नंतर हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करावा.
  • व ऑनलाईन प्रकारे परीक्षा शुल्क भरावे.
  • सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाची एक प्रिंट काढावी व ती निवडलेल्या अभ्यासकेंद्रात जमा करावी.

No comments:

Post a Comment

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...