जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातर्गत बदल्याबाबत सुधारित धोरण 18 जून 2024


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातर्गत बदल्याबाबत सुधारित धोरण 18 जून 2024
https://drive.google.com/file/d/129V1u6ZJgUwYZpOC2GDNdMKehxDdw0_E/view?usp=drivesdk

नवीन पदस्थापना देणेपूर्वी जिल्हा अंतर्गत विनंती बदली बाबत...

नवीन पदस्थापना देणेपूर्वी जिल्हा अंतर्गत विनंती बदली बाबत...

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया बाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, सातारा यांचे आदेश 12 मार्च 2024


अतिरिक्त झालेल्या जि.प. शिक्षकांचे समायोजन 


बदली प्रक्रिया 2024/25 बाबत...🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


(टीप - बदली वेळापत्रक नेहमी बदलत आहे.. त्यानुसार अद्यायावत वेळापत्रक पहावे.)✳️ *जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया अपडेट* 
*1) बदली प्रक्रियेमध्ये यानंतरचा टप्पा?* 
*2) बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे*

https://bit.ly/3V4i1xG

*दिनांक 18 जानेवारी 2023*
✳️ *बदली प्रक्रियेमध्ये यानंतरचा टप्पा?* 

➡️ *जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या बाबत दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित करून बदल्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले होते ते पुढील प्रमाणे.*

➡️ *या अगोदरच्या वेळापत्रकानुसार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी संवर्ग तीन म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या पोर्टलवर पूर्ण करणार आहे*

➡️ *दिनांक 20 जानेवारी 2023 ला बदली पोर्टलवर बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्याची यादी व पोर्टलवर आपली बदली कुठे झालेली आहे हे समजेल*

➡️ *20 जानेवारी 2023 रोजीच मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पदांच्या याद्या पुन्हा प्रकाशित करतील.*

➡️ *बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.*

➡️ *सदर वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया पार पडली असता दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध करून देऊ शकतात*

✳️ *बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे*

➡️ *बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या जिल्ह्यातील एकूण सेवाजेष्ठतेनुसार करण्यात येतील*

➡️ *ज्या शिक्षकांना कार्यरत शाळेवर सर्वसाधारण क्षेत्रात सलग पाच वर्ष व कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण होत असतील तर अशा सर्व शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षाकांमध्ये करण्यात येतो*

 ➡️ *बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.*दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकता.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.*➡️ *बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त जागा व रिक्त जागा  पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास दिसणार आहेत.* 

➡️ *बदली पात्र शिक्षकांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम न भरल्यास जिल्ह्यातील उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांना बदलीने नियुक्ती दिली जाईल*

➡️ *बदली पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम  देतांना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहेत तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा शक्यतोवर आपला फार्म सबमिट होणार नाही*

➡️ *परंतु ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळेवर सलग पाच वर्ष व अवघड क्षेत्रातच दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली असेल तरीसुद्धा अशा शिक्षकांना बदली पात्र टप्प्यामध्ये पसंतीक्रम देता येणार नाही कारण अवघड क्षेत्रातील शिक्षक हे शासन निर्णय 7 एप्रिल 2021 नुसार बदली पात्र ठरवता येत नाही*

➡️ *बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास कोणत्याही यादीमध्ये शाळांची शोधाशोध करण्याची गरज नाही.बदली पात्र  शिक्षकांच्या पोर्टलवर दिसणाऱ्या  सर्व शाळा ह्या बदली पात्र  शिक्षकांकरिता उपलब्ध  केलेल्या आहेत बदली पात्र यादी किंवा रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणातंर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे*

➡️ *बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस दिलेल्या आहेत त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये*

➡️ *या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेतांना आपणास पोर्टलवर सर्वसाधारण क्षेत्रातील  आपली सेवाजेष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासकरून बदलीसाठी प्राधान्यक्रम देतांना निर्णय घ्यावा कारण बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त शाळा व जिल्ह्यातील रिक्त शाळाच प्राधान्यक्रमात द्यावयाचा आहे अशावेळी संभाव्य रिक्त शाळा या सर्वसाधारण क्षेत्राबरोबरच अवघड क्षेत्रात जास्त प्रमाणात असू शकतात*

https://bit.ly/3V4i1xG

➡️ *बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र टप्प्यामध्ये बदली न मिळाल्यास त्यांना विस्थापित व्हावे लागेल व पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये प्राधान्यक्रम भरावा लागेल अशा वेळी बदली पात्र टप्प्यामधील शाळांपेक्षा निश्चितच विस्थापित टप्प्यामधील शाळा ह्या आपल्या गैरसोईच्या असतील*

➡️ *सर्वसाधारण क्षेत्रातील विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक ज्यांनी सर्वसाधारण क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष पूर्ण केलेली आहे व कार्यरत शाळेमध्ये पाच वर्षे झालेले आहेत त्यांनी बदलीस होकार दिला असेल तर त्यांच्या पसंतीक्रमाने त्यांना संवर्ग एकच्या टप्प्यात बदली मिळाली असेलच परंतु त्यांच्या पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास पुन्हा त्यांना बदली पात्र बदली टप्प्यामध्ये पसंती क्रम भरण्यास संधी मिळेल* 

➡️ *पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल  त्यापैकी एकाने आपल्या जोडीदाराजवळ जाण्यासाठी पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत अर्ज केला असेल व  कदाचित त्या शिक्षकाला पती-पत्नी अंतर्गत बदली मिळाली नसेल अशा परिस्थितीत आपला जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदाराची बदली पात्र बदली  टप्प्यामध्ये पसंती क्रम भरण्याची संधी मिळेल व त्यांची बदली होईल*

➡️ *पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटरच्या आत असेल तर असे शिक्षक फक्त बदली पात्र शिक्षक बदली टप्प्यामध्ये एक युनिटचा लाभ घेऊ शकतात त्यापैकी एका बदली पात्र शिक्षकाने बदली पात्र टप्प्यांमध्ये पसंती क्रम देत असताना जर आपल्याला आपल्या जोडीदाराला सुद्धा सोबत बदलीने घ्यायचे असल्यास आपल्या जोडीदार शिक्षकाला शाळेवर तीन वर्ष झालेले असेल तर त्यांना सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊन दोघांनाही बदली पात्र टप्प्यामध्ये पसंती क्रम भरून एक युनिट चा लाभ घेऊ शकतात अशी सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे*

https://bit.ly/3V4i1xG

➡️ *पती-पत्नी दोघांनाही एक युनिट म्हणून बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्येच लाभ घेऊ शकता परंतु या टप्प्यामध्ये जर दोघांनाही 30 किलोमीटरच्या परिसरात शाळा मिळाल्या नाही तर ते शिक्षक विस्थापित होऊन रँडम राऊंड मध्ये गेल्यानंतर  त्यांना एक युनिटचा लाभ घेता येणार नाही अशा शिक्षकांना बदली देताना 30 किलो मीटरच्या परिसरात शाळा देणे बंधनकारक राहणार नाही त्यामुळे एक युनिटचा लाभ घेताना वरील बाबीचा विचार करावा*

➡️ *बदली पात्र बदली टप्प्यामध्ये एक युनिट म्हणून दोन समान लिंग असणाऱ्या व्यक्ती एक युनिटचा लाभ घेऊ शकणार नाही*

➡️ *प्राधान्यक्रम भरताना बदली पात्र शिक्षकांनी खालील लिंकला क्लिक करावे* 

https://ott.mahardd.in/

*वरील लिंकला क्लिक  केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP  टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे*

➡️ *सदर पोस्ट आपण इतर ग्रुप वर व मित्रमंडळ फॉरवर्ड करावी जेणेकरून त्यांनाही फायदा होईल*


➡️ *सदर ही पोस्ट विन्सिन कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व जीआर च्या आधारे तयार केलेली आहे या मताशी आपण सहमत असालच असं सांगता येणार नाही* 

*याबद्दल कोणतीही शंका असल्यास आपण मला सरळ कॉल करू शकता*
*धन्यवाद*
✳️ *संवर्ग 3 पसंतीक्रम कसा भरावा* 
✳️ *बदली अधिकार पात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांना दि. 10 ते 14 जानेवारी दरम्यान बदली फॉर्म भरता येतील. दिलेल्या मुदतीत कितीही वेळा फॉर्म सबमिट करुन पुन्हा Withdraw करु शकता.*

➡️ *मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.*

➡️ *16 ते 19 जाने. दरम्यान प्रक्रिया राबवून 19 जानेवारी ला बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या जाहीर होतील.*

➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या बदलीसाठी धरावयाच्या सेवाजेष्ठतेने करण्यात येतील *GR परिच्छेद 4.4.3 नुसार*

➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदली प्रक्रियेमध्ये आपला बदली करिता पसंतीक्रम भरला नाही तर त्यांची बदली होणार नाही*

➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली अर्ज केलेला असेल परंतु त्या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना पुन्हा बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदली करिता अर्ज भरण्याची संधी मिळू शकते* 
*(संदर्भ 7 जून 2022 वेंसिसने विचारलेल्या प्रश्नाला शासनाने दिलेले उत्तर )*

➡️ *सद्य परिस्थितीत बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्याच जागा दाखवल्या जातील*

➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये किंवा शासन आदेशामध्ये बदली अधिकार पात्र शिक्षक बदली पात्र होतो असे कोठेही म्हटले नसल्यामुळे बदली अधिकार मात्र शिक्षक बदली पात्र होत नाही त्यामुळेच अशा शिक्षकांना त्यांनी पाच वर्षे सेवा शाळेवर व त्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण केले असतानाही त्यांना शाळा न मिळाल्यास असे शिक्षक विस्थापित होणार नाहीत* 

➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पोर्टलवर बदली करिता पसंतीक्रम दिला आणि त्यांच्या सेवाजेष्ठतेने व त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळाली तरच बदली होईल त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळांना न मिळाल्यास त्यांची बदली होणार नाही ते आहे त्या शाळेवर राहतील*

https://bit.ly/3V4i1xG

➡️ *बदली अधिकार पात्र टप्प्यामध्ये बदली अधिकार पात्र शिक्षक हे एक युनिटचा लाभ घेऊ शकणार नाहीत*

➡️ *सन 2019 च्या अवघड क्षेत्रातील यादीतील शाळा 2021/2022 मध्ये सुगम झाली आणि 2022 बदलीमध्ये त्या शिक्षकाची बदली नाही झाली तर पुढील बदली प्रक्रियेमध्ये त्या शिक्षकास नवीन यादी ज्या दिवशी घोषित झाली तेथून 10 वर्ष बदली होणार नाही* 

➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम देतांना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहे तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा शक्यतोवर आपला फार सबमिट होणार नाही*

➡️ *एखाद्या अवघड क्षेत्रातील शाळेमधील एक पद समानीकरणांतर्गत ठेवलेले असेल व बदली मागून सुद्धा शिक्षकाची बदली झालेली नसेल तर अशा परिस्थितीत तेथे कोणत्याही शिक्षकास इतरत्र पदस्थापित केले जाणार नाही*

*अनेक जिल्ह्यांमध्ये बदली अधिकार मात्र शिक्षकांची संख्या एक हजारावरून जास्त आहे व अशा परिस्थितीत त्यांना बदली पात्र शिक्षकांच्या दाखवल्या जाणाऱ्या जागा नाममात्र असल्यामुळे अशा परिस्थितीत प्रशासनास बदली अधिकार प्रात्र शिक्षकांच्या बदल्या करणे शक्य नाही तरीसुद्धा बदली प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यामध्ये काही निर्णय घेऊन अवघड क्षेत्रातील रिक्त राहणाऱ्या जागांबरोबरच बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या जागाही या टप्प्यात रिक्त दाखविल्यास निश्चितच अवघड क्षेत्रातील रिक्त राहणाऱ्या जागांच्या बदली प्रक्रियेमध्ये बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या होऊ शकतात शेवटी प्रशासनाच्या मानसिकतेवर*

➡️ *बदली समिती अध्यक्षांच्या मते पुढील बदली प्रक्रिया 2023 - 24 दिनांक 1 मार्च 2023 ते 31 मे 2023 दरम्यान आठ ते नऊ बदली आदेशात बदल करून राबविण्यात येईल*

✳️ *पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंक वर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता*

✳️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा*

https://ott.mahardd.in/

➡️ *वरील लिंक वर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे*

➡️ *डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे*

https://bit.ly/3V4i1xG

➡️ *त्यातील application form वर क्लिक करावे*

➡️ *Entitle application form वर फॉर्म भरणाऱ्या शिक्षकाची खालील माहिती *स्क्रीनवर दिसेल त्यावर* 
*शिक्षकाचे नाव* 
*आडनाव* 
*शाळेचा यु डायस नंबर* 
*शिक्षकाचा शालार्थ आयडी* 
*ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही*

➡️ *वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही*

➡️ *त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल*
*पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर*

➡️ *खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल*

➡️ *याचाच अर्थ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या शाळांपैकी 30 प्राधान्यक्रम अथवा 30 पेक्षा कमी प्राधान्यक्रम उपलब्ध असल्यास उपलब्ध असलेले प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे* 

➡️ *प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मेनू मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down मधून शाळा निवडावी*
 
➡️ *शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील* 
*किती मंजूर पदे*
*किती कार्यरत पदे*
*शाळेतील रिक्त पदे*  
*समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे* 
*बदली पात्र शिक्षकांची पदे*
*ह्या सर्व शाळा निहाय संख्या दिसतील*

https://bit.ly/3V4i1xG


➡️ *Add tab वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल*

➡️ *आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे*

➡️ *Add केलेली प्रत्येक शाळा save या tab वर क्लिक करून save करावी*

 ➡️ *आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल*

➡️ *अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडतांना add preferences वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save करावी*

https://bit.ly/3V4i1xG

➡️ *अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही*

➡️ *यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल*

➡️ *संपूर्ण application form भरून सबमिट केल्यानंतर व मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर आपला application form आपल्या रजिस्टर ईमेलवर पीडीएफ स्वरूपात आपणास लगेच प्राप्त होईल*

➡️ *तसेच आपणास आपल्या प्राधान्यक्रमामध्ये काही बदल करायचं असल्यास आपण आपला फॉर्म मुदतीपूर्वी withdraw करू शकता व पुन्हा भरू शकता*
 
➡️ *वरील माहितीतील प्रत्येक मुद्द्यांशी आपण सहमत असालच असे नाही त्याकरिता प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा*    

*काही अडचण असल्यास कॉल करू शकता* *-----------------------------------*
https://bit.ly/3V4i1xG
========================


*बदली*
➡️  *विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया आटोपलेली असून त्यांची बदली कोणत्या शाळेत झाली ती माहिती पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे* 

✳️✳️ *विशेष संवर्ग भाग-2 महत्त्वाचे मुद्दे*

➡️ *दिनांक 30 डिसेंबर 2022 ते 4 जानेवारी 2023 दरम्यान विशेष संवर्ग  भाग 2 (पती-पत्नी एकत्रीकरण) च्या शिक्षकांना पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध होईल* *वरील तारखांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो*

➡️ *विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांनी  पोर्टल वर जाऊन दोघांपैकी ज्या शिक्षकाला बदली हवी आहे  त्या शिक्षकांनी बदलीसाठी होकार पोर्टल वर जाऊन  यापुर्वीच अपडेट केलेला आहे त्याच शिक्षकाला पुन्हा application form भरावयाचा आहे*

➡️ *विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षकांना पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत शासन निर्णयातील मुद्दा क्र.1.9.1 ते 1.9.6 प्रमाणे व्याख्येतील प्राधान्यक्रमांनुसार  शिक्षकांच्या बदल्या होतील. याठिकाणी आपली जिल्हा सेवाज्येष्ठता विचारात घेतली जाणार नाही*

➡️ *विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना जिल्ह्यांतील निव्वळ रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त जागा प्राधान्यक्रमांमध्ये भरता येतील अर्थातच ह्याच शाळा आपणास पोर्टलवर दिसतील*

➡️ *विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग 2 चा लाभ घेतल्यानंतर पुढील बदली प्रक्रियेमध्ये दोघांपैकी एक जरी शिक्षक बदली पात्र होत असेल तर दोघांनाही एक युनिट मानून संवर्ग चार मधून बदली देण्यात येऊ शकते(GR  मुद्दा क्र.4.3.4)*

➡️ *विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांच्या जोडीदाराने संवर्ग एक मध्ये अर्ज भरला व त्यांची स़वर्ग एक मधून बदली झालीअसल्यास त्यांना पुन्हा विशेष संवर्ग भाग दोन मध्ये फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे विशेष संवर्ग भाग दोन मधील जोडीदार शिक्षक विस्थापित होऊ शकतो*

➡️ *विशेष संवर्ग 2 मधील शिक्षकांना  जोडीदाराच्या पंचायत समिती मधील कोणतीही शाळा निवडता येईल येथे 30 किलोमीटर चे अंतर गृहीत धरले जाणार नाही परंतु पंचायत समिती कार्यक्षेत्राबाहेर कार्यालयापासून किंवा शाळेपासून फक्त तीस किलोमीटर परिसरातीलच  30 शाळा निवडता येतील*

➡️ *30 कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात जवळच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात येईल.*

➡️ *संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरतांना कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 30 शाळा भरणे अनिवार्य आहेत*
 
➡️ *जर आपण बदली पात्र नसाल आणि आपणास बदली ची आवश्यकता असेल तर संवर्ग 2 च्या यादीतील आपला प्राधान्यक्रम व उपलब्ध असलेल्या शाळा यांचा समन्वय साधून  जास्तीत जास्त किंवा 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरावा  व आपणास आहे ती शाळा सोयीची असेल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीचीच शाळा कायम राहील* 

*परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये अवघड क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे  अशावेळी विशेष संवर्ग भाग दोन मघून आपली बदली न झाल्यास अशावेळी आपल्या जोडीदाराची सेवा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त झाली असेल व शाळेवर 3 वर्षापेक्षा जास्त आणि  पाच वर्षापेक्षा कमी झाली असेल तर अशावेळी आपल्या जोडीदार शिक्षकांचा समावेश अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरतांना तयार करायचे यादीमध्ये सेवाज्येष्ठतेनूसार होऊ शकतो  या संदर्भात कोणतीही शिक्षण विभागाकडून  स्पष्टता नसल्यामुळे  बदली संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा*

➡️ *आपण बदली पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळतील अन्यथा आपण विस्थापित होऊन पुन्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये आपणास फॉर्म भरावा लागेल*

➡️ *ज्या शिक्षकांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त आहे अशा शिक्षकांचा समावेश विशेष संवर्ग भाग दोन मध्ये होतो अशा शिक्षकांपैकी जर एक शिक्षक संवर्ग एक मध्ये येत असेल व त्या शिक्षकांनी संवर्ग एक मधून अर्ज करून बदली मिळाली असेल तर अशा शिक्षकांचा जोडीदार संवर्ग दोन मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेऊ शकतात कारण संवर्ग एकच्या शिक्षकांनी घेतलेल्या बदलीमध्ये सदृश्यता नसल्यामुळे व अद्याप आदेश प्रकाशित न झाल्यामुळे बदलीचा लाभ घेऊ शकतात*

➡️ *परंतु अशा स्थितीमध्ये संवर्ग एक शिक्षकाची बदली रद्द होऊन जोडीदाराला लाभ देण्यात येईल*

➡️ *तसेच दोघेही पती-पत्नी बदली प्रक्रियेमध्ये येत असतील व त्यापैकी एका शिक्षकांनी संवर्ग एकचा लाभ घेतलेला असेल व दुसरा जोडीदार हा बदलीस पात्र असेल तर त्यांना एक युनिटचा लाभ दिला जाणार नाही*

➡️ *ज्या दोन शिक्षकांच्या शाळेमधील अंतर हे 30 किलोमीटरच्या बाहेर असेल व त्यापैकी एकाने आपल्या जोडीदाराजवळ जाण्यासाठी पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत अर्ज केला असेल व  कदाचित त्या शिक्षकाला  पती-पत्नी अंतर्गत  बदली मिळाली नसेल अशा परिस्थितीत आपला जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदाराची बदली पात्र बदली  टप्प्यामध्ये बदली होईल*

✳️ *पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंक वर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता*

✳️ *विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा*

https://ott.mahardd.in/

➡️ *वरील लिंक वर क्लिक  करावे क्लिक  केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP  टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे*

➡️ *डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे*

➡️ *त्यातील application form वर क्लिक करावे*

➡️ *त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर application type  व action असे दोन ऑप्शन दिसतील*

➡️ *Cadre 2 च्या समोर view application चा tab दिसेल application tab वर क्लिक केले की*

➡️ *Cadre 2 application form वर फॉर्म भरणाऱ्या शिक्षकाची खालील माहिती *स्क्रीनवर दिसेल त्यावर* 
*शिक्षकाचे नाव* 
*आडनाव* 
*शाळेचा यु डायस नंबर* 
*शिक्षकाचा शालार्थ आयडी* 
*ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही*

➡️ *त्याखाली आपणास आपल्या जोडीदाराच्या व आपल्या शाळेतील अथवा कार्यालयातील अंतर दिसेल ते अंतर निश्चितच 30 किलोमीटरच्या वर असेल*

➡️ *त्याखाली आपणास आपला व्याख्येतील प्राधान्यक्रमानुसार प्रकार दिसेल*

➡️ *त्यानंतर आपणास आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा आपल्या जोडीदाराचा मोबाईल क्रमांक दिसेल*

➡️ *आपल्या जोडीदाराचे नाव दिसेल*

➡️ *त्यानंतर आपला जोडीदार ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेचा युडायस क्रमांक दिसेल*

➡️ *त्यानंतर आपल्या जोडीदार ज्या शाळेत कार्यरत असेल त्या शाळेचे नाव दिसेल*

➡️ *वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही*

➡️ *त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल*
*पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर*

➡️ *खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास कमीत कमी एक व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल*

➡️ *याचाच अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम आपण निवडू शकता*

➡️ *प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मेनू मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down  मधून शाळा निवडावी*
 
➡️ *शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील* 
*किती मंजूर पदे*
*किती कार्यरत पदे *
*शाळेतील रिक्त पदे*  
*समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे* 
*बदली पात्र शिक्षकांची पदे*
*ह्या सर्व शाळा निहाय संख्या दिसतील*

➡️ *Add tab  वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल*

➡️ *आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add  केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे*

➡️ *या ठिकाणी संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या जागा संभाव्य रिक्त जागा म्हणून दाखवल्या जातील व त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास वरील प्रकारच्या पोर्टलवर दाखविल्या जाणाऱ्या शाळाच   प्राधान्यक्रमांमध्ये भरणे आवश्यक आहे*

➡️ *Add केलेली प्रत्येक शाळा save या  tab वर  क्लिक करून  save करावी*

 ➡️ *आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून  do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल*

➡️ *अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडतांना add preferences  वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save  करावी*

➡️ *अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही*

➡️ *यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल*

➡️ *संपूर्ण application form भरून सबमिट केल्यानंतर व मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर आपला application form आपल्या रजिस्टर ईमेलवर पीडीएफ स्वरूपात आपणास लगेच प्राप्त होईल*
 
➡️ *वरील माहितीतील प्रत्येक मुद्द्यांशी आपण सहमत असालच असे नाही त्याकरिता  प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा*
बदली नवीन सुधारित वेळापत्रक 20 डिसेंबर 2022👇👇
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹28 नोव्हेंबर चे वेळापत्रक 👇👇👇


 
*जिल्हांतर्गत बदली अपडेट्स*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✳️ *2022 च्या बदल्या दिनांक 30 जून 2022 या तारखेनुसार केल्या जाणार आहेत. त्यामुळे या तारखेला सिस्टिमला व्हॅलीडेशन असणार आहे.* 

✳️ *बदली बाबत आपणास कोणतीही शंका असल्यास दि.07/04/2021 चा शासन निर्णय व ग्राम विकास* *विभागामार्फत वेळोवेळी आलेली सूचना पत्रे काळजीपूर्वक वाचावीत तसेच विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकृत VDO काळजीपूर्वक पाहावेत/ऐकावेत.*

✳️ *विशेष संवर्ग भाग एक च्या शिक्षकांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया*

➡️ *पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर पोर्टलच्या डाव्या मेनूमध्ये intra district टॅब दिसेल*

➡️ *या टॅब वर क्लिक केले की application form  टॅब दिसू लागेल*

➡️ *त्यावर क्लिक केले की apply cadre 1. व  apply cadre 2*
*हे दोन टॅब दिसतील*

➡️ *जे शिक्षक विशेष संवर्ग 1 चा लाभ घेऊ इच्छिता त्यांनी apply cadre 1 वर क्लिक करावे व जे शिक्षक विशेष संवर्ग 2 चा लाभ घेऊ इच्छितात त्यानी apply cadre 2  वर क्लिक करावे*

➡️ *Apply cadre 1  वर क्लिक केले की एक आपल्याला स्विकरण स्विकारावे लागेल*

➡️ *विशेष वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांची बदली ही त्यांच्या खालील प्राधान्य क्रमानुसार होईल*

➡️ *शासन निर्णय 7 एप्रिल 2021 चे आदेशातील* 
*व्याख्यातील प्राधान्य क्रमानुसार*
*त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार*
*जन्मतारखेप्रमाणे*
*व आडनावातील पहिल्या इंग्रजी* *आद्याक्षराप्रमाणे* 
*वरील प्राधान्य क्रमानुसार बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल*

➡️ *तसेच विशेष स़वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे प्रमाणपत्र आपल्या वरिष्ठ कार्यालयाला जमा करणे अनिवार्य आहे तसेच हे प्रमाणपत्र जर अवैद्य ठरल्यास किंवा प्रमाणपत्र देण्यास असमर्थ ठरल्यास वरील शिक्षकांचा बदली अर्ज रद्द करण्यात येईल*

➡️ *वरील स्विकारण स्विकारल्यानंतर विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना बदली अर्ज दिसू लागेल*

➡️ *या अर्जामध्ये शिक्षकाचे नाव ,आडनाव, शालार्थ आयडी,व शाळेचा यु-डायस क्रमांक दिसून येईल*

➡️ *त्याखाली ज्या शिक्षकांचे नाव बदली पात्र यादीमध्ये आलेले असून त्यांना बदलीतून सूट हवी असेल म्हणजेच बदली नको असेल तर अशा शिक्षकांनी dropdown मधून Yes हा पर्याय निवडावा व* 

➡️ *ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून सूट नको असेल म्हणजेच बदली हवी असेल  तर अशा शिक्षकांनी dropdown मधून No हा पर्याय निवडावा*

➡️ *त्याखालील dropdown मधून विशेष संवर्गाचा प्रकार निवडावा* 

➡️ *त्या ठिकाणी Self व Spouse हे दोन पर्याय दिसतील*

➡️ *Self म्हणजे विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांनी स्वतः संदर्भात असलेल्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या संबंधित असलेला आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा*

➡️ *Spouse म्हणजे ज्या शिक्षकांचे जोडीदार आजाराने ग्रस्त असतील त्यांनी Spouse हा प्रकार निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या जोडीदाराच्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा*

➡️ *व आपला अर्ज सबमिट करावा*

➡️ *शिक्षकाचे वय 53 वर्ष किंवा 53 वर्षापेक्षा जास्त झाले असेल  व त्यांचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर अशा  शिक्षकांना बदलीतून सूट हवी असेल तर त्यांनी Yes हा पर्याय निवडून Self मधील dropdown मधील 13 क्रमांकाचा मुद्दा प वयाने 53 वर्ष झालेले कर्मचारी हा पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा*

➡️ *कोणत्याही शिक्षकाला फक्त एका वेळी एकाच संवर्गाचा लाभ मिळू शकेल*

 ➡️ *एखाद्या शिक्षकांनी संवर्ग एक मध्ये अर्ज केला असेल तर त्याला संवर्ग दोन चा लाभ मिळणार नाही पर्यायाने आपल्या जोडीदार संवर्ग दोन मध्ये असेल तर तो विस्थापित होईल*

✳️ *विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया*

➡️ *जे शिक्षक संवर्ग दोन मध्ये येतात त्यांनी अर्ज भरतांना Apply cadre 2 या टॅब वर क्लिक करावे*

➡️ *क्लिक केल्यानंतर त्याखालील एक स्विकरण स्विकारावे लागेल त्याशिवाय अर्ज दिसणार नाही*

➡️ *ते खालील प्रमाणे*
*विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे अंतराचे प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला देणे अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र देण्यास शिक्षक असमर्थ असेल तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल*

➡️ *वरील प्रकारचे स्विकरण स्विकारल्यानंतर शिक्षकाचा अर्ज स्क्रीनवर दिसून येईल*

➡️ *अर्जावर शिक्षकाचे नाव ,आडनाव ,शालार्थ आयडी व शाळेचा यु डायस क्रमांक दिसून येईल*

➡️ *त्याखालील आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कार्यालयातील किंवा शाळेतील अंतर द्यावे लागेल हे अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल*

➡️ *त्यानंतर खालील दिलेल्या dropdown मधून आपल्या विशेष संवर्ग भाग दोन चा प्राधान्यक्रम निवडावा लागेल*

➡️ *वरील पर्याय विशेष संवर्ग भाग दोनच्या व्याख्येतील प्राधान्य क्रमाने असतील*

➡️ *जर तुम्ही 1.9.1 पहिला पर्याय पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद चे कर्मचारी हा पर्याय निवडल्यास*

➡️ *त्याखालील जोडीदाराचा शिक्षक प्रकार निवडावा लागेल*

➡️ *त्याखालील जर आपण Primary हा पर्याय निवडला तर तेथे जोडीदाराचा मोबाईल क्रमांक किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल हा पर्याय दोन्ही पती-पत्नी जिल्हा परिषद चे शिक्षक असून या बदली प्रक्रियेमध्ये असतील अशा शिक्षकांसाठी आहे*

➡️ *त्याखाली आपल्याला एक स्विकारण स्विकारावे लागेल*

➡️ *ते खालील प्रमाणे*
*आपल्या जोडीदाराने* *संवर्ग एक मधून अर्ज भरलेला असल्यास व आपण पती-पत्नी* *एकत्रीकरण अंतर्गत विशेष वर्ग भाग दोन मधून अर्ज करत असल्यास दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य असल्यामुळे आपण विस्थापित होऊ शकता हे मला मान्य आहे*

➡️ *वरील स्विकारण स्विकारल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव, शाळेचे नाव ,शाळेचा यु-डायस क्रमांक स्क्रीनवर दिसून येईल.*

➡️ *त्याखालील सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट होईल*

➡️ *जर आपण जोडीदाराचा शिक्षक प्रकार other than primary हा पर्याय निवडल्यास म्हणजेच हा पर्याय सुद्धा प्राधान्यक्रमातील 1.9.1 एक मधील पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील त्यापैकी एक शिक्षक असेल व एक जिल्हा परिषद चा शिक्षक अथवा कर्मचारी असेल अशांकरिता लागू आहे* 

➡️ *आपणास जोडीदारचा मोबाईल नंबर किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल*

➡️ *त्यानंतर जोडीदार चे नाव, शाळेचे नाव, युडायस क्रमांक व उपलब्ध असलेली माहिती टाकून सबमिट करावा*

➡️ *आपणास जर पहिल्या पर्याय व्यतिरिक्त (1.9.2 ते 1.9.6 )दुसरा कोणताही पर्याय असल्यास तो पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा*

➡️ *तसेच विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांनी दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य आहे जर दोघांपैकी एकाने संवर्ग एक मधून व दुसऱ्याने संवर्ग दोन मधून अर्ज केल्यास संवर्ग दोन मधून अर्ज करणारा शिक्षक विस्थापित होऊ शकतो*

✳️ *पोर्टलवर फॉर्म कसा भरावा याबाबत विन्सिस सॉफ्टवेअर कंपनी कडून पाठवलेला VDO काळजीपूर्वक पाहावा.*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

बदली वेळापत्रक 
(संक्षिप्त)
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*जि प शिक्षक जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक 2022*(शासन परिपत्रकनुसार )


*🏮💥विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि.5/11/2022 ते 7/11/2022.*


*🏮💥विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)*


*🏮💥विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)*


*🏮💥बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)*


*🏮💥बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस)*


*🏮💥विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे. दि.22/12/2022 ते 24/12/2022 (3 दिवस)*


*🏮💥अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे. दि. 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस)*


*🏮💥बदलीचे आदेश प्रकाशित करणे. दि. 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस)*


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


21 ऑक्टोबर 2022

जिल्हा अंतर्गत बदली सुधारित वेळापत्रक
👇👇👇20 ऑक्टोबर 2022

*🎯शिक्षक बदली 2022 बाबत महत्वाचे🎯*
💥💥💥💥💥


*🎯बदली वर्ष  2022:-*
                        *सर्वसाधारणपणे बदली वर्ष हे ३० मे पर्यंत धरण्यात येते परंतु ४ मे २०२२ रोजी काढलेल्या पत्रानुसार यावर्षी हे बदली वर्ष ३० जून पर्यंत वाढविण्यात आलेले आहे.* 

*🎯बदलीसाठी धरावयाची सेवा :-*
                        *अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३० जून पर्यंत झालेली एकूण सेवा.*

*🎯सक्षम अधिकारी  :-*
                        *शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम अधिकारी राहील*

*🎯बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक  :-*
                      *ज्या शिक्षकांची शाळा  अवघड क्षेत्र मध्ये असेल व एकूण सेवा 3 वर्षे झालेली असेल असे शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक असतील* 

*🎯बदली पात्र शिक्षक  :-*

*🌈सर्वसाधारण क्षेत्र +अवघड क्षेत्र+ कार्यरत जिल्ह्यात सलग सेवा १० वर्ष पूर्ण + विदयमान शाळेत सेवा ५ वर्ष पूर्ण  बदली पात्र शिक्षक*

*कार्यरत जिल्ह्यात सलग सेवा १० वर्ष पूर्ण विदयमान शाळेत सेवा ५ वर्ष पूर्ण*
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴
*संवर्ग निहाय शिक्षकांना किती शाळा भरता  येणार तसेच बदली कशी होणार याची माहिती खाली दिलेली आहे*. 

*विशेष संवर्ग भाग 1 :*

*पसंतीक्रम : विशेष संवर्ग भाग १*

*🎯शासन निर्णयात नमूद प्राधान्य क्रम, सेवाज्येष्ठता, जन्मतारीख, आडनावातील पहिले इंग्रजी वर्णश्वर यानुसार प्राधान्य दिले जाईल.*

*🎯सिस्टमद्वारे बदली प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर केली जाईल.*

*🎯शिक्षकांना त्यांचा विनंतीवरूनच बदली देण्यात येईल*

*🎯या अंतर्गत शिक्षकांची बदली बदलीपात्र शिक्षकांच्या जागी होईल.*

*🎯विशेष संवर्ग 2 :*

*🎯विशेष संवर्ग भाग २ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम देण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.*

*🎯कमीतकमी १ शाळा व जास्तीत जास्त ३० शाळांचे पसंतीक्रम देणे आवश्यक आहे.*

*🎯पती पत्नी दोघे ही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकतो.*

*🌈बदली अधिकार प्राप्त शिक्षक ( संवर्ग 3 )*

*🌈बदली अधिकार पात्र शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम देण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.*

*🎯३० शाळांचा पसंतीक्रम देणे आवश्यक आहे.*


*🌈बदलीपात्र शिक्षक ( संवर्ग 4 )*

*पसंतीक्रम : बदलीपात्र*

*🎯सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून, बाकी सर्व शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.*

*🎯सेवाज्येष्ठता, जन्मतारीख, आडनावाती पहिले इंग्रजी वर्णाक्षर यानुसार प्राधान्य देऊन पसंतीप्रमाणे बदली होईल*.

*🎯विस्थापित शिक्षक :*

*पसंतीक्रम : विस्थापित शिक्षक*

*🎯सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून, उरलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी / बदलण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.*

*🎯या शिक्षकांनी ३० अथवा रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे.*

*तसेच सविस्तर माहिती पाहण्यासाठी ब्लॉग ला भेट दया..*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


20 ऑक्टोबर 2022

आंतर जिल्हा बदली संवर्ग 1 गरोदर व स्तनदा माता  पदस्थापना देणे बाबत आजचे पत्र 👇====================


12 ऑक्टोबर 2022
बदली बाबतीत स्पष्टीकरण 👇👇👇


===================

*बदल्या होणार*

*बदलीबाबत आजचे पत्र*

*19 सप्टेंबर 2022*

https://cutt.ly/qHfY3rh*सर्वांना पाठवा.*🌷 *जिल्हांतर्गत बदली* 🌷

📌 *Ott पोर्टलवर Personal लॉगिन केल्यानंतर जे शिक्षक बदलीप्राप्त आहेत,त्यांच्या नावापुढे-Eligible (बदलीपात्र) असे दिसेल.* 

📌 *जे शिक्षक बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांच्या नावापुढे-Entitled (बदली अधिकार प्राप्त) असे दिसुन येईल.*
*बदली पोर्टल लिंक* 👇


*सर्व GR व अपडेट्स*👇👇👇


      *Ott Portal वर Login करून खात्री करावी*

*प्रक्रिया 11 सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता...*

आंतरजिल्हा बदली झालेल्या बांधवाना 5 सप्टेंबर 2022 पूर्वी कार्यमुक्त करण्याबाबतचे आजचे पत्र... 👇👇👇


26 ऑगस्ट 2022 रोजीचे अवघड क्षेत्राबाबत अत्यंत महत्वाचे पत्र 👇👇👇


==================


23 ऑगस्ट 2022

सर्व जिल्ह्यातील आंतर जिल्हा बदली बदली होऊन आलेले व स्व जिल्ह्यात / सोईच्या जिल्ह्यात गेलेले बांधव.... एकत्रित यादी..👇👇👇.


=================

22 ऑगस्ट 2022


आंतर जिल्हा बदली झालेल्या बांधवांची जिल्हा वार यादी पहा.. 👇👇👇
(यादी अपडेट सुरू आहे... निळ्या अक्षरातील जिल्हे अपडेट केले आहेत...)अकोला


औरंगाबाद


गडचिरोली

गोंदिया


जळगांव


ठाणे

धुळे


नागपूर


नाशिक

बुलढाणा


मुबई उपनगर

मुंबई शहर 

यवतमाळ

रत्नागिरी


लातूर

वर्धा

वाशीम

सांगली


सिंधुदुर्ग

*शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या - सुरू*

19 ते 20 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना सुरुवात झाली आहे. दुसऱ्या जिल्ह्यात बदली करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी आपला पर्याय सूचित केला होता. त्यानुसार, सॉफ्टवेअरने 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार सर्व नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे, आणि शिक्षकांच्या बदल्या सुरू केल्या आहेत. कोणत्याही संभाव्य मानवी हस्तक्षेपाशिवाय सॉफ्टवेअर पूर्णपणे स्वयंचलित आहे. वापरलेल्या प्रत्येक नियमाची संपूर्ण लॉग-बुक आणि प्रत्येक निर्णयाची पायरी ठेवली जाते, कारण ती स्क्रीनवर दिसते.

_निर्णय घेताना ऑटोमेशन_

सॉफ्टवेअर 34 लूप पर्यंत चालेल. सर्वात सोप्या लूपमध्ये- उदाहरणार्थ, पुण्यातून एक शिक्षक साताऱ्याला जाईल आणि साताऱ्यातून एक शिक्षक पुण्याला येईल. 3 जिल्ह्यांच्या लूपमध्ये, पुण्यातील एक शिक्षक साताऱ्याला जाईल, साताऱ्यातून एक शिक्षक सोलापूरला जाईल, सोलापूरचा शिक्षक पुण्यात येईल - त्याद्वारे परस्पर रिक्त जागा भरल्या जातील. राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांची लूप तयार करणे हे सॉफ्टवेअरद्वारे केले जाणारे सर्वात जटिल ऑपरेशन असेल.

"हा एक उपाय आहे जो समांतर गणना ब्लॉक साखळी आणि हायपर प्रोसेसिंगचा वापर करत आहे 'n ते n' क्रमपरिवर्तनांची गणना करण्यासाठी आणि एकल मानवी हस्तक्षेपाशिवाय अतिशय जटिल डेटा आणि एकाधिक नियम प्रक्रियेवर सर्वात इष्टतम गणना केलेले परिणाम तयार करण्यासाठी, "म्हणाले Vinsys चे CTO नीलेश देविदास या कंपनीने सॉफ्टवेअर विकसित आणि देखरेख करण्याचे कंत्राट दिले.

प्रथमच, ठराविक नियमांच्या आधारे निर्णय घेणे सॉफ्टवेअरकडे हस्तांतरित केले गेले आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे. सरकारमध्ये वापरल्या जाणार्‍या बर्‍याच सॉफ्टवेअर्सचा वापर संबंधित अधिकार्‍याकडून निर्णय घेणे सुलभ करण्याच्या उद्देशाने डेटा गोळा करण्यासाठी, डॅशबोर्ड तयार करण्यासाठी, संग्रहित डेटा आणण्यासाठी केला जातो. पुणे जिल्हा परिषदेने यापूर्वी महालाभार्थी सॉफ्टवेअरमध्ये पात्रता पडताळण्यासाठी ऑटोमेशनचा वापर केला आहे.

अत्यंत प्रभावशाली व्यक्तींना मी त्यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या हस्तांतरणासाठी मदत का करू शकत नाही हे समजावून सांगणे मला अवघड काम आहे - कारण प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित आणि नियमाने बांधलेली आहे.

_सुपर कम्प्युटिंग पॉवर_

आंतरजिल्हा हस्तांतरणासाठी क्लाउडवर होस्ट केलेल्या प्रत्येक नोड्समध्ये 8 वर्च्युअल मशीन सीपीयू असलेल्या 6 नोड्सचा वापर 14 फेऱ्यांमध्ये डेटा मोजण्यासाठी केला जात आहे. डेटा गणनेसाठी 31 तास लागतील अशी अपेक्षा आहे. संगणकीय शक्ती वाढविण्यासाठी ब्लॉक चेन तयार करण्यात आली आहे.

सोप्या शब्दात, 48 संगणक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी 31 तास सतत संगणन करत असतील. प्रत्येक संगणकाची प्रत्येक गणना आणि प्रत्येक निर्णय लॉगबुकमध्ये नोंदविला जातो.

_डेटा अचूकता_

प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रत्येक संवर्गातील जाती प्रवर्गांना विभागीय आयुक्तांनी मान्यता देणे यासारखी विस्तृत प्रशासकीय पावले.

शिक्षकांनी प्रविष्ट केलेल्या डेटाचे ऑनलाइन सोशल ऑडिट करण्यात आले. संपूर्ण पारदर्शकतेमुळे प्रणालीला शिक्षकांचा विश्वास संपादन करण्यात मदत झाली.

शिक्षक आणि त्यांच्या संघटनांशी व्यापक चर्चा केल्यानंतर शिक्षकांच्या बदलीचे धोरण तयार करण्यात आले. सोशल मीडियाचा वापर मत व्यक्त करण्यासाठी आणि अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर वादविवाद सुलभ करण्यासाठी केला गेला. हे धोरण सर्व शिक्षक वर्गाने मनापासून स्वीकारले आहे.

_सुरक्षा ऑडिट_


Cert-IN सुरक्षा प्रमाणपत्र, STQC Complainve, सॉफ्टवेअरचे Sigma 6 रेटिंग राखण्यासाठी अंतर्गत अनुपालन, अॅप स्कॅन आणि इतर सुरक्षा प्रमाणपत्रे घेतली आहेत. क्लाउड प्रदाता बँकांना सेवा प्रदान करण्यासाठी अधिकृत आहे आणि अनेक बँकांना आणि अनेक केंद्र आणि राज्य सरकारांना अशा सेवा प्रदान करते.

सर्व व्यवहार आणि निर्णयांचे ऑडिट ट्रेल असते.
ब्लॉक चेन न बदललेल्या पॅटर्नसह ऑडिट लेजरमध्ये डेटा संग्रहित केला जातो. सर्व डेटा बदलांसाठी संबंधित डेटा मालकाकडून OTP प्रमाणीकरण आवश्यक आहे.


================

.   🌷  🌷🌷

 *बदली अपडेट*


➖➖➖➖➖
*शिक्षक सर्वसाधारण बदल्या २०२२*

*आंतरजिल्हा  बदलीबाबत*

*जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमित होणार*

💠 *१} एन.ओ.सी पैकी आठास एक हस्तांतरित यांमध्ये ४ फेऱ्या होतील.*

💠 *२} संवर्ग १ - ९६०पैकी ५७५ बदल्या यांसाठी १० फेऱ्या होतील .*

💠 *३} संवर्ग २: ४ तास लागतील .*

💠 *४} जनरल संवर्ग  रेकॉर्डली ९ हजार पर्सन टू पर्सन चेनसह सुमारे २० तास लागतील.*

*(काम अजूनही प्रगतीपथावर आहे.)*

 *ओ.टी.टी सॉफ्टवेअरद्वारे शिक्षकांची बदली केली जात आहे.*

*आता शिक्षकांच्या बदलीसाठी ४८ संगणक असलेली ही यंत्रणा १४ फेऱ्यांमध्ये ३१ तास चालणे अपेक्षित आहे.सामान्यांचे जवळपास ९ हजार रेकॉर्ड आहेत. त्यांची रिक्त तसेच साखळी पद्धतीने बदली अपेक्षित आहे. यासाठी २० तास वेळ लागू शकतो. ४८ तज्ञ यासाठी आपल्या संगणकांवर काम करीत आहेत. सर्वांनाच लवकरच गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे.*

*सोमवारी दि.२२ ऑगस्ट रोजी पोर्टलवर बदली आदेश प्राप्त होतील.*

➖➖➖➖➖➖➖➖

==================

11/08/2022

🚨🚨🚨🚨🚨

*शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन*

*सुधारित वेळापत्रक*

🔥 जिल्हा परिषद शिक्षकांची बिंदुनामावली अपलोड करणे : ०२ ऑगस्ट ते ०३ ऑगस्ट, २०२२

🔥 बिंदुनामावली प्रसिद्ध करणे: ०४ ऑगस्ट, २०२२

🔥 बिंदुनामावली शिक्षकांना अवलोकन करीता प्रसिद्ध करणे: ०४ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट, २०२२

🔥 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी आंतर जिल्हा बदलीकरीता अर्ज करणे: ०५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट,

🔥 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अर्ज पडताळणी : १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट, २०२२

🔥 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही सुरू: १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट,

🔥 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमितः १८ ऑगस्ट, २०२२

🪩 GR लिंक: आंतरजिल्हा शिक्षक बदली 👇👇👇🪩  GR लिंक: जिल्हांतर्गत शिक्षक बदली 👇👇👇


*ब्रॉडकास्ट लिस्ट ला ऍड होण्यासाठी 9850222750 या नंबर वर मॅसेज करा.*

==================

🌹🌹🌹🌹🌹

==================

आंतरजिल्हा बदल्या सुरू झाल्या आहेत.
शिक्षक आजपासून आंतरजिल्हा अर्ज भरू शकतात. सर्व शिक्षकांसाठी एनओसी, संवर्ग-1, संवर्ग-2, सर्वसाधारण (General) अर्ज भरण्याची तारीख सुरू झाली आहे. शिक्षक हा अर्ज 09/08/2022 मध्यरात्री 12:00 पर्यन्त भरू शकतील. सर्व BEO, EO, शिक्षकांना संदेश प्रसारित करा जेणेकरून फॉर्म वेळेवर भरता येतील आणि सबमिट करता येतील.

महत्वाच्या सूचना

1. एक शिक्षक फक्त एका संवर्गात फॉर्म भरू शकतो.

2. जर शिक्षक संवर्ग-1 किंवा संवर्ग-2 असेल आणि त्याच्याकडे NOC असेल तर त्याला कोणत्या श्रेणीत फॉर्म भरायचा आहे हे त्याला ठरवायचे आहे.

3. ग्रामविकास विभागाकडील दि. 10 जून, 2022 च्या पत्रातील निर्देशानुसार आंतरजिल्हा बदली प्रकरणात ना हरकत प्रमाणपत्र (NOC) धारक शिक्षकांनी, त्यांना ज्या जिल्हा परिषदेकडे जायचे आहे, त्या जिल्हा परिषदेने

दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचा (NOC) क्रमांक व दिनांक नमूद करणे आवश्यक आहे. 4. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षक घोषित केले गेले आहेत ते रोस्टरमध्ये रिक्त जागा वजा दाखवतील. अशा

परिस्थितीत जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक या जिल्ह्यातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत इतर जिल्ह्यातील एकही शिक्षक या जिल्ह्यात येऊ शकत नाही.

5. ज्या जिल्ह्यामध्ये रोस्टर शून्य आहे त्या जिल्ह्यामध्ये बदल्या साखळी पद्धतीने होतील जर त्या जिल्ह्यातून

एखाद्या शिक्षकाची बदली झाली तरच त्या जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यातून शिक्षक बदलीने येतील.

6. संवर्ग-2 मध्ये (Both in ZP) (प्राथमिक व्यतिरिक्त / other than primary) निवडल्यावर तुम्हाला सेवार्थ आयडी / शालार्थ आयडी आणि जोडीदाराचे नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे जे अनिवार्य आहे आणि

UDISE कोड आणि शाळेचे नाव अनिवार्य नाही (रिक्त सोडले जाऊ शकते).

7. एकदा फॉर्म सबमिट केल्यावर फॉर्म संपादित किंवा अद्यतनित करण्याचा कोणताही मार्ग नाही आणि म्हणून

शिक्षकांनी फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरले पाहिजेत.

8. बिंदुनामावली मधील रिक्त जागा पाहूनच आपला बदलीचा अर्ज पोर्टलवर भरावा.

================

सर्व जिल्हा रोस्टर👇👇👇👇(04/08/2022)=================


विशेष संवर्ग भाग 2 - अर्ज कसा भरावा 👇👇👇
(02/08/2022)=================
बदली प्रक्रिया सुरू 1 ऑगस्ट 2022 रोजीचे पत्र व वेळापत्रक👇👇👇

शिक्षकांनी आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज कसा भरावा (भाग 1)
(01/08/2022)


शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज कसा भरावा. (भाग 2)
(01/08/2022)NOC - ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे काय??
21 जुलै 2022 👇👇👇बदली अपडेट

21 जुलै 2022बदली वेबसाईट ओपन करा 👇👇👇

==================

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दि.18 जुलै 2022
आंतर जिल्हा बदली बाबत विन्सिस सॉफ्टवेअर द्वारा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ👇👇👇

*आंतरजिल्हा आँनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया २०२२ | Teacher Transfer Portal 2022*🫧 *बुधवार पासून सुरु होण्याची शक्यता*


🫧 *34 जिल्ह्याचे रोस्टर होणार पूर्ण*

🫧 *noc, cadre 1, cadre 2 व general या चार गटानुसार होणार बदली*

🫧 *सेवा अट 5 वर्षे*


🫧 *बदलीसाठी निवडावे लागणार 4 जिल्हे*

🫧 *बदल्या साखळी पद्धतीने होणार*


==================

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शिक्षक बदली पत्र 15 जुलै 2022


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌼🌼🌼🌼🌼

बदलीबाबत आजचे पत्र
14 जुलै 2022

बदल्याबाबत बिंदू नामावली अपडेट करण्याबाबत...🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*प्राथमिक शिक्षक बदली फेज - 2 ----17 जुलै पासून सुरु*

*तक्रारी 15 जुलै पर्यंत सादर कराव्यात*
 *सविस्तर वाचा*👇
==================

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


*🎯बदल्या बाबत काल 6 जुलै 2022 रोजी VC झाली त्यामधील ठळक मुद्दे*👆👆👆👆👆👆👆👆👆
https://cutt.ly/qHfY3rh

◆प्रत्येक जिल्ह्याची रोस्टर ची अचूक माहिती मेल वरून मागवली.(विलंब टाळण्यासाठी यापूर्वीच सूचना दिल्या होत्या.)

◆ती माहिती कंपनीला देऊन फेज 2(आंतरजिल्हा बदली प्रक्रिया) सुरु करण्याबाबत सूचना देण्यात येतील असे सांगितले.

◆31जुलै पर्यन्त मुदत घेतली असल्याने अन्य तांत्रिक बाबींची अडचण येणार नाही.

◆जिल्हानंतर्गत बदल्या वेळेत होण्यासाठी यंदा प्रत्येक संवर्गला कालावधी कमी करण्यासाठीचा शासन निर्णय काढला असल्याबाबत सांगण्यात आले.
*1) बदल्यांना 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ*
*2) BEO ना फोर्स ACCEPTANCE करावे लागेल*

https://cutt.ly/qHfY3rh
=================

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*बदली पोर्टल 2022*

https://cutt.ly/qHfY3rh

 *💠शिक्षक स्तरावरावरुन प्रोफाइल भरण्यासाठी पोर्टल बंद झाले आहे .प्रोफाईल अक्सेप्ट करण्यासाठी, अपिल करण्यासाठी चालु आहे .*
 
*💠ज्या शिक्षकांच्या दुरुस्तीसाठी राज्यस्तरावर फाइल गेली होती . त्या दुरुस्त्या होवुन येतील तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे.* 

*💠ज्या शिक्षकांची दुरुस्ती अभावी किंवा स्वत: होवुन येण केन प्रकारे आपली प्रोफाइल सबमिट करणे राहिले आसेल त्यानी काळजी करु नये .*

*💠 ज्या शिक्षकांचे प्रोफाईल दुरुस्ती अभावी पेंडींग आहेत त्यांच्या सर्व दुरुस्त्या होवुन गटस्तरावरुन दिनांक ०६-०७-२०२२ ते ०८-०७-२०२२ या कालावधी दरम्यान प्रोफाइल अपडेट करुन व्हेरीफाय केले जातील .*

*💠 माझा फॉर्म राहिला म्हणुन कोणीही विचलीत होवुन जाऊ नये .*

*💠 जिल्ह्यातील एकही शिक्षक प्रोफाइल अपडेशन - व्हेरीफिकेशन पासुन वंचित ठेवला जाणार नाही .*

*💠 ज्या शिक्षकानी गटशिक्षणाधिकारी स्तरावरुन केलेली दुरुस्ती मान्य नाही म्हणुन अपिल टु इओ केलेले आहे त्या सर्व शिक्षकाना दिलेल्या वेळेत सुनावणीसाठी आवश्यक त्या पुराव्यासह शिक्षणाधिकारी (प्रा) यांचा दालनामध्ये उपस्थित राहुन आपले म्हणने लेखी व तोंडी म्हणने मांडावे लागेल व त्याच ठीकाणी आपणास निर्णय दिल्या जाणार आहे व मा. शिक्षणाधिकारी यानी दिलेला निर्णय हा अंतिम आसणार आहे*

*💠 जिल्ह्यातील आथवा राज्यातील कोणत्याही शिक्षकाविरुध आपणास सार्वजनिक तक्रार करायची असेल तर करु शकता . डिरेक्टरी मध्ये जाउन जिल्हा तालुका व शिक्षकाचे नाव शोधुन कोणत्याही शिक्षकाची प्रोफाइल आपणास पाहता येते. जर इतरांच्या प्रोफाइल मध्ये काही खोटी माहिती आपणास आढळली तर आपण त्या शिक्षकाच्या प्रोफाइल वर जाउन मा . मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बदली पोर्टलमधुनच अपिल (तक्रार) करु शकता. परंतु आपल्याकडे ठोस पुरावे असावे लागतात . पुराव्या अभ्यावी तक्रार केल्यास तक्रारदार दोषी ठरणार आहे .*

*💠 ज्या शिक्षकांच्या प्रोफाइल गटस्तरावरुन व्हेरीफाय झाल्या आहेत त्या शिक्षकानी आपल्या प्रोफाइल तात्काळ अक्सेप्ट कराव्यात आणि काही गटस्तरावरुन दुरुस्ती केली असेल व आपणास ती मान्य नसेल तर अपिल टु इओ करावे . सर्व माहिती बरोबर आसल्यास तात्काळ अक्सेप्ट करावे .*

*वेळापत्रकाप्रमाणे सर्व काम सुरू आहे .(माहितीस्तव)*

https://cutt.ly/qHfY3rh
🌹🌹🌹🌹🌹

=================


बदली नक्की कधी होणार?

बदलीबाबत टप्पा व संवर्ग निहाय कालावधी निश्चित
29 जून 2022 चा 
GR पहा..👇👇👇👇


🌹🌹🌹🌹🌹

=================


20 जून रोजीचे बदली बाबत चे पत्र
खालील लिंक वरून डाउनलोड करा....


===============

प्रश्न तुमचे, उत्तरं आमचे🌹🌹🌹🌹🌹

===============


बदली पोर्टल भरणेबाबत अधिकृत व्हिडिओ (विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीद्वारे)👇👇👇


🌹🌹🌹🌹🌹


===============

.   🌷  🌷🌷

 *बदली अपडेट* 
 ➖➖➖➖➖
*बदली फॉर्म सबमीट करण्यापूर्वी ...* 

*सर्वसाधारण बदल्या २०२२*

प्राथमिक शिक्षकांना आपली प्रोफाईल अपडेट करताना व गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षकांची प्रोफाईल ॲक्सेप्ट  करताना मदत होण्‍यासाठी खालील काही महात्‍वाच्‍या बाबी उपयोगात येतील. या बाबी संपूर्ण वाचाव्‍यातच. 

*बदल्‍यांकरीता पदावधीची परिगणना दि ३० जून २०२२ ही आहे.*

Personal Details
Personal Details मध्‍ये पुढील बाबी आहेत
Salutation, First Name, Middle Name, Last Name, Date of Birth, Gender, Mobile Number, Adhaar Number, PAN Number, Email, Shalarth ID, Marital Status 
या बाबींमध्‍ये काहीही बदल करता येत नाही. तथापि शिक्षकांनी या गोष्‍टी काळजीपूर्वक पाहून घ्‍याव्‍यात.

या नंतर आपल्‍याला ज्‍यावर काम करायचे आहे असा Employment Details हा भाग येतो. या भागामध्‍ये प्रत्‍येक माहिती आपल्‍याला बदलता येते व आपल्‍या दृष्‍टीने हा महत्‍वाचा भाग आहे.

त्‍यातील प्रत्‍येक मुद्याचे स्‍पष्‍टीकरण खालील प्रमाणे.

*1. Date of Appointment in ZP*
या रकाण्‍यात मुळची सलग सेवा दिनांक भरलेली दिसेल. ती काळजीपूर्वक तपासवी. जर शिक्षकाच्‍या सेवाकाळात अंतरजिल्‍हा बदली झाली असेल तर येथे पुर्वीच्‍या जिल्‍ह्यातील मुळची सलग सेवा दिनांक नमुद केली आहे का याची खात्री करावी.

*2. Cast Category*
येथे आपल्‍या जातीचा प्रवर्ग दिसेल. तो अचूक आहे का पहावे नसल्‍यास योग्‍य तो पर्याय निवडावा.

*3. Appointment Category*
येथे ज्‍या जातप्रवर्गातून आपली *नियुक्‍ती* झालेली (नोकरी लागलेली आहे) आहे तो जात प्रवर्ग दिसेल. तो अचूक आहे का याची खात्री करावी, चूकीचा असल्‍यास तो दुरूस्‍त करावा.

*4. Current District Joining Date*
या रकाण्‍यातील तारिख काळजीपूर्वक तपासावी. जर आपल्‍या एकुण सेवेत पुर्वी आपली अंतरजिल्‍हा बदली झाली असेल तर येथे सध्‍याच्‍या जिल्‍ह्यातील (अहमदनगर) हजर दिनांक लिहावा. Date of Appointment in ZP व Current District Joining Date या दोनही रकान्‍यात एकच तारिख असेल तर त्‍या शिक्षकाची या पूर्वी कधीही अंतरजिल्‍हा बदली झालेली नाही हे सिद्ध होते.

आपसी अंतरजिल्‍हा बदलीबाबत अनेक गैरसमज आहेत. या बाबतीत असे सूचीत करण्‍यात येते की, आपसी आंतरजिल्‍हा बदलीने अहमदनगर जिल्‍ह्यात हजर झाल्‍याची स्‍व:तची जिल्‍ह्यातील हजर तारीख नमुद करावी. *(मा न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार मा. मु.का.अ. यांच्‍या आदेशाने जेष्‍ठता दिनांक दिलेले शिक्षक वगळता)*

*5. UDISE Code of Current School*
हा रकाना अत्‍यंत काळजीपूर्वक तपासावा. आपल्‍या सध्‍याच्‍या शाळेचा अचूक UDISE कोड आहे याची निट तीन वेळा खात्री करावी. जर UDISE कोड चूकीचा असेल व आपण तो तसाच ठेवला तर आपल्‍यासह इतरांचीही बदलीची पुढची सर्व प्रक्रिया चूकिची होणार आहे.

*6. Current School Joining Date*
हा रकाना कोरा आहे, या रकाण्‍यात सध्‍याच्‍या शाळेतील हजर दिनांक लिहायचा आहे. यामध्‍ये अत्‍यंत महत्‍वाची बाब म्‍हणजे जर अंतरजिल्‍हा बदलीने शिक्षक हजर झाल्‍यानंतरची पहिलीच शाळा असेल तर कधी ऑर्डर उशीरा मिळते, काही शिक्षकांच्‍या आदेशात अंशत: बदल होते. अशा शिक्षकांच्‍या बाबतीत  Current District Joining Date व Current School Joining Date या दोनही तारखा सरख्‍याच असतील म्‍हाणजेच ते शिक्षक जरी शाळेवर उशीरा हजर झाले असतील तरी जिल्‍ह्यातील हजर दिनांक हीच त्‍यांची शाळेवरील हजर दिनांक गृहित धरावी लागेल.

*7. Current Teacher Type*

या रकान्‍यात शिक्षकांना त्‍यांचे सध्‍याचे पद दिसेल. तो चूकीचा असेल व त्‍यात बदल करायचा असल्‍यास Graduate (पदवीधर)/ Under Graduate (उपाध्‍यापक) / Headmaster (मुख्‍याध्‍यापक) हे तीन पर्याय येतात. योग्‍य तो अचूक पर्याय निवडावा.

*8. Teaching Subject Type*

जर शिक्षक उपाध्‍यापक अथवा मुख्‍याध्‍यापक पदावर कार्यरत असतील तर येथे NA दिसेल व पदवीधर शिक्षक असतील तर येथे त्‍यांचा पदवीचा विषय दिसेल. काही बदल हवा असेल तर या रकाण्‍यात Under Graduate/ Headmaster या दोन्‍ही पदांसाठी NA हा पर्याय निवडावा फक्‍त Graduate शिक्षकांसाठीच Social Science/ Maths and Science/ Language या तीन पैकी एक पर्याय निवडावा.

*9. Teaching Medium Marathi Urdu*
या रकान्‍यात Marathi/ Urdu या पैकी योग्‍य असलेला पर्याय आहे का ते पहावे नसेल तर योग्‍य पर्याय निवडावा. येथे पर्याय निवडताना चूक झाली तर मराठी माध्‍यमाच्‍या शिक्षकाची बदली उर्द शाळेवर व उर्दू माध्‍यमाच्‍या शिक्षकाची बदली मराठी शाळेवर होईल.

*10.Last Transfer Category*
हा रकाना शिक्षकांना भरावा लागतो. सन २०१८ पासून ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू झालेली असल्‍याने यामध्‍ये प्रत्‍येकाची बदली संवर्गानुसार झालेली आहे. त्‍यामुळे या प्रक्रिये द्वारे झालेली बदली झालेल्‍या शिक्षकांचा बदली प्रवर्ग Cadre-1(सवर्ग १)/ Cadre-2(सवर्ग (२)/ Entitled(बदली अधिकार प्राप्‍त)/ Eligible (बदली पात्र) या पैकी एक येईल. तसेच या बदल्‍यांमध्‍ये विस्‍थापित झाल्‍यामुळे Random Round ने झालेली बदली असेल तर त्‍यांचा बदली प्रवर्ग Eligible असेल.
सन २०१८ पूर्वी झालेली ऑफलाईन बदली/ पदोन्‍नती/ पदावनती / समायेजन तसेच २०१८ नंतर झालेली पदोन्‍नती / पदावनती/ समायोजन/ कोर्ट आदेश या मुळे बदली झाली असल्‍यास अशा सर्वांनी NA हा पर्याय निवडावा.

*11.Last Transfer Type*
हा रकानाही शिक्षकांना भरावा लागतो. आपली शेवटची बदली/ पदस्‍थापना ज्‍या प्रकारे झालेली आहे त्‍यानुसार योग्‍य पर्याय निवडावा. जर शेवटची बदली/ पदस्‍थाना जिल्‍हांतर्गत झालेली असेल तर Intra District. जर शेवटची बदली अंतरजिल्‍हा झाली असेल तर Inter District या पैकी योग्‍य तो पर्याय निवडावा. येथे अनेक शिक्षकांचा नेहमी Inter District व Intra District या दोन बाबतीत गोंधळ होतो. Inter District म्‍हणजे अंतरजिल्‍हा बदली व Intra District म्‍हणजे जिल्‍हांतर्गत बदली.
Date of Appointment in ZP पासून कोणत्‍याही प्रकारची बदली झालेली नसेल व शिक्षक पहिल्‍याच शाळेत असेल तर येथे NA पर्याय निवडावा.

*12. Have You Worked Continuously in Non Difficult Area For Last 10 Years? किंवा Have You Worked Continuously in Difficult Area For Last 10 Years?*
जेव्‍हा सध्‍याच्‍या शाळेत शिक्षक ५ वर्ष अथवा त्‍यापेक्षा जास्‍त कालावधीसाठी कार्यरत असेल तेव्‍हा सध्‍याची शाळा ज्‍या क्षेत्रात आहे उदा. सध्‍याची शाळा सोप्‍या क्षेत्रात असेल तर Have You Worked Continuously in Non Difficult Area For Last 10 Years? असा प्रश्‍न दिसेल व सध्‍याची शाळा अवघड क्षेत्रात असेल तर Have You Worked Continuously in Difficult Area For Last 10 Years? असा प्रश्‍न दिसेल.
येथे Yes/ No हे दोन पर्याय असतात. जर येथे Yes पर्याय निवडला तरच शिक्षक बदलीपात्र होतो, म्‍हणजे सध्‍याच्‍या क्षेत्रात १० वर्ष व सध्‍याच्‍या शाळेत ५ वर्ष सेवा पुर्ण झाली आहे असे समजण्‍यात येते.
जर No  असा पर्याय निवडला तर संबंधीत शिक्षक बदली पात्र होणार नाही कारण सध्‍याच्‍या क्षेत्रात त्‍याची १० वर्ष सेवा झालेली नाही असा संदेश system ला जाईली व त्‍याची बदली होणार नाही.
म्‍हणजेच हा पर्याय अत्‍यंत महत्‍वाचा आहे. या बाबत विचारपूर्वक निर्णय घ्‍यावा. शिक्षकांची  Profile Accept करताना या बाबीकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल, कारण याबाबत जे प्राधिकरण Profile Accept करेल ते संबंधीत शिक्षकांइतकेच जबाबदार राहिल.

*13. Have You Been Suspended in Last 10 Years?*
जर संबंधीत शिक्षक बदली संदर्भ तारखे पूर्वी दहा वर्षात निलंबीत असेल तर येथे Yes पर्याय निवडावा व नसल्‍यास No पर्याय निवडावा. याचा थेट परिणाम बदलीपात्र होण्‍यावर असल्‍याने ही बाबही काळजीपूर्वक तपासावी.

*धन्‍यवाद*
 
. 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌 *ऑनलाईन बदली प्रक्रिया  आंतरजिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या शिक्षकांची शाळा रुजू दिनांक कोणती असावी याबाबत मार्गदर्शक सूचना :-*

⏩ *उदाहरण :- समजा एखादा शिक्षक इतर जिल्हा परिषदेतून जालना जिल्हा परिषदेमध्ये दिनांक - 01.05.2021 रोजी आंतरजिल्हा बदलीने उपस्थित झाला असेल...*
*मात्र जिल्हा शिक्षण विभागातील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होऊन त्यास झाले पदस्थापना देण्यास काही दिवसांचा कालावधी लागला असेल आणि पदस्थापना आदेश घेऊन सदरील शिक्षक हा प्रत्यक्ष नियुक्ती दिलेल्या शाळेवर दिनांक-18.05.2021 रोजी उपस्थित झाला असेल तर...*

*आणि संबंधित शिक्षकास दिनांक- 01.05.2021 ते 17.05.2021 ह्या कालावधीचे उपस्थितीचे पत्र दिले असेल.*

*तर अशा शिक्षकांची बदली माहिती भरताना शाळा रुजू दिनांक ( current School joining date) ही जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासून ची  म्हणजेच दिनांक:- 01.05.2021 अशीच नमूद करणे क्रमपात्र आहे.*

*व त्यानुसारच संबंधिताच्या सेवा पुस्तिकेत देखील या बाबीची नोंदघेणे अपेक्षित आहे.*

*कृपया उपरोक्त सूचनेप्रमाणे आपल्या तालुक्यातील आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची माहिती अचूक नोंदणी करून घ्यावी.*

- कैलास दातखीळ शिक्षणाधिकारी प्राथमिक,
जिल्हा परिषद जालना.
(साभार)


🌹🌹🌹🌹🌹

बदली प्रोफाइल अपडेट कशी करायची पी. डी. एफ. स्पष्टीकरण 👇👇👇
🌹🌹🌹🌹🌹


बदली प्रोफाइल अपडेट कशी करायची व्हिडिओ स्पष्टीकरण 👇👇👇


🌹🌹🌹🌹🌹

बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त म्हणजे काय? 👇👇👇
🌹🌹🌹🌹🌹

💥 *ऑनलाइन  शिक्षक बदली पोर्टल 2022*

👇 *शिक्षक प्रोफाईल अपडेट करणे.*
🎯 *Step by Step Guide*
👇 *Online Teacher Transfer Portal ( ottportal )*
https://cutt.ly/qHfY3rh

🎯 *ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वपूर्ण संबोध :-*

➡️ *Personal details* मधील माहिती आपणास बदल करता येत नाही. या माहितीमध्ये चुका असतील तर BEO कार्यालयाशी संपर्क साधावा. 

⏩ *Last Transfer Category :*
1) Cadre 1- *संवर्ग 1*
2) Cadre 2- *संवर्ग 2*
3) Entitled - *संवर्ग -3*
4) Eligible- *संवर्ग -4*
5) NA- *लागू नाही*

⏩ *Last Transfer Type :*
1) *Inter District* - आंतर जिल्हा बदली
2) *Intra District* - जिल्हा अंतर्गत बदली
3) NA- *लागू नाही*

♦️ *सर्व शिक्षकांना आपली प्रोफाईल अपडेट करावी लागणार आहे.*♦️ *IMP*
प्रोफाईल सबमिट करण्याची घाई करु नये. प्रोफाईल सबमिट करण्याची अंतिम मुदत - 20 जून पर्यंत आहे.

🌹🌹🌹🌹🌹
🚩 *बदली पोर्टल अपडेट -*

https://cutt.ly/qHfY3rh

👉🏻 *Profile Update ची सुविधा सुरू झाली आहे. परंतु जोपर्यंत अधिकृत सूचना मिळत नाहीत तोपर्यंत कोणीही माहितीत बदल करू नये. तशा अधिकृत सूचना शिक्षण विभागाकडून आपणास मिळतील किंवा वेळापत्रक प्रकाशित होईल*

👉🏻 *सदर पोर्टल नव्यानेच असल्याने व एकाच वेळी अनेक शिक्षक पोर्टलला भेट देत असल्याने सुरुवातीला काही अडचणी येणे संभव आहे.*

👉🏻 *आतापर्यंत अनेकजणांना लॉगिन करताना सुरूवातीला OTP प्रॉब्लेम येत आहे. तो दूर झाला आहे. तरीही मोबाईलवर OTP येत नसेल तर दिलेल्या मेल आयडी मधील inbox किंवा spam फोल्डर चेक करावे.*

👉🏻 *आतापर्यंत जवळपास ८१ हजार शिक्षकांनी पोर्टल ला भेट दिली आहे. पैकी ३५ हजार शिक्षकांनी आपली सेवा विषयक माहिती अपडेट केली आहे. असे महितीद्वारे कळाले आहे*
 

🤔  *प्रोफाईल अपडेट कोणी करायची ?*

👉🏻 *बदली पात्र असो वा नसो प्रत्येक शिक्षकाने म्हणजे 100% शिक्षकाने पडताळून पाहणे आवश्यक आहे. आपली सेवा विषयक माहिती अपडेट केल्यावर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पुन्हा पडताळणी होणार आहे.*

👉🏻 *माहिती अपडेट करणे म्हणजे आपली बदली होणारच असे कदापीही नाही.*

#-#-#-#-#-#-#-#-#

📲 *बदली पोर्टलला लॉगीन कसे करावे ?*👉🏻 *बदली पोर्टलला लॉगीन केल्यानंतर काही सूचना वाचायच्या आहेत. आणि Accept करा.*

👉🏻 *बाजूला Profile दिसते. त्यावर Click करा.* 

👉🏻 *Profile दोन पेज मध्ये आहे. Personal Details व Employment Details.* 

 👉🏻 *profile अपडेट करण्याची सुविधा दि. 13-06-2022 ते 22-06-2022 पर्यंत आहे, असे कळते* 

👉🏻 *Personal Details मधील माहिती आपल्याला बदलवता येणार नाही.*

👉🏻 *Employment Details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करुन अचूक भरावयाची आहे. तरी काळजीपूर्वक भरा. यासाठी शक्य होत असल्यास जवळील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.*

👉🏻 *Date of Apponitment- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये. प्रत्यक्ष शाळेवरील रुजू दिनांक भरावा.*

👉🏻 *Cast category - ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा. आपल्या मूळ नियूक्ती आदेशावर दिलेली आहे.*

👉🏻 *Appointment category- ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.*

👉🏻 *Current District Joining Date- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये. आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा.*

👉🏻 *Udise Code of Current School कार्यरत शाळेचा युडायस नंबर चेक करुनच भरावा. Current School Joining Date- यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये.* 

👉🏻 *Current Teacher Type Graduate / Under Graduate / Headmaster यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.* 

👉🏻 *Teaching Subtype- यामध्ये Graduate Teacher असेल त्यांनी भाषा / गणित-विज्ञान / समाजशास्त्र यापैकी सिलेक्ट करा. इतरांनी Not Avaible हे ऑप्शन निवडा*

👉🏻 *Teaching medium या मध्ये Marathi निवडा.*

👉🏻 *Last Transfer Category - सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होवून आलात तो संवर्ग ड्रॉप डाउन मधून सिलेक्ट करा.* 

👉🏻 *Last Transfer Type - सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होवून आलात तो प्रकार ड्रॉप लिस्ट मधून सिलेक्ट करा लागून नसल्यास N/A सिलेक्ट करा*
#-#-#-#-#-#-#-#-#

📍📌🪂 *बदली पोर्टल संदर्भात माहिती ही माझ्या सद्सद्विवेक बुद्धीने, प्राप्त माहितीआधारे  आपणास मदत व्हावी म्हणून दिली आहे. सर्व सूचना प्रशासनाच्या अंतिम राहील.*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

🌹🌹🌹🌹🌹

*जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या सन 2022*

1.   https://ott.mahardd.in/ या  बदली पोर्टल ला आपला मोबाईल टाकून OTP मिळाल्यानंतर लॉगिन केल्यावर आपल्या समोर सूचना येतील त्या काळजीपूर्वक वाचा.

2. डाव्या बाजूला मेनू मध्ये Profile दिसेल त्यावर क्लिक करा.
3. Profile   मध्ये दोन भाग आहेत.1. Personal details  व 2.employment details.

4. शिक्षकांना profile update करण्याची सुविधा *दिनांक 13/ 6/ 2022  पासून ते दिनांक 20/ 6/ 2022* पर्यंतच आहे.

5.वरील कालावधीत सर्व शिक्षकांनी आपले profile update करणे अनिवार्य आहे.

6. *Personal details* मधील माहिती आपल्याला बदलता येणार नाही.

7. *Employment details* मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करून अचूक काळजीपूर्वक बिनचूक भरायची आहे.

*8. Date of appointment* - यामध्ये शिक्षकांनी सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे व आंतर जिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा *(ऑर्डर वरील दिनांक भरू नये)*

*9. Cast category* -  Drop down लिस्ट मधून सिलेक्ट करावा.

*10. Appointment category* - ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा आपल्या मूळ नियुक्ती आदेशावर दिलेली आहे.त्यानुसारच नोंद करणे

*11. Current district joining date* - यामध्ये शिक्षकांनी सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे व  आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा *(ऑर्डर वरील दिनांक भरू नये)*

12. Udise  code of current School - शिक्षकांनी कार्यरत शाळेचा यु डायस नंबर चेक करूनच काळजीपूर्वक बिनचूक भरावा.

13. Current School joining date - यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे *(ऑर्डर वरील दिनांक भरू नये)*

14. *Current teacher type* - Graduate /  Under graduate यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा.

15. *Teaching subtype*  यामध्ये graduate teacher असेल त्यांनी *भाषा/ गणित -विज्ञान /समाजशास्त्र* यापैकी एक आपल्या आदेशात नमूद असलेला विषय सिलेक्ट करावा

16. *Teaching Medium* - या मध्ये Marathi/ Urdu आपल्या शाळेचे माध्यम निवडा.

17.*Last Transfer Category* - सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होऊन आलात तो संवर्ग ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.*(2019 मधील अवघड व सर्वसाधारण क्षेत्र)*

18.*Last Transfer Type* - सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होऊन आलात तो प्रकार ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा लागू नसल्यास NA निवडा.

19.Have you been suspended in last 10 years ?
आपण मागील 10 वर्षात निलंबित झाले असल्यास yes नमूद करावे.


🌹🌹🌹🌹🌹

लॉग ईन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्याचे निवारण  👇👇👇

🌹🌹🌹🌹🌹
*पोर्टलवरील डाटा अपडेट संदर्भात महत्वाच्या बाबी*
जेव्हा शिक्षक पहिल्यांदा लॉग इन करतात तेव्हा काय होते?

पहिल्यांदा पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, शिक्षक प्रथम अस्वीकरण संदेश पाहू शकतो जो त्याला स्वीकारणे आवश्यक आहे. जेव्हा शिक्षक प्रोफाइल टॅबवर क्लिक करतो, तेव्हा शिक्षकाला महत्त्वाच्या नोट्स दिसू शकतात ज्या शिक्षकाने स्वीकारल्या पाहिजेत.

शिक्षकाला त्याचा/तिचा प्रोफाइल डेटा कुठे मिळेल ?

शिक्षकाने TT पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर, डाव्या मेनूमधून प्रोफाइलवर क्लिक केल्यावर तो त्याचे प्रोफाइल पाहू शकतो आणि ते संपादित करू शकतो.

शिक्षकाची प्रोफाइल मधील माहिती बरोबर किंवा पूर्ण नसल्यास अपडेट कशी करावी ?

शिक्षकाने TT पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर, शिक्षक डाव्या मेनूमधून प्रोफाइलवर क्लिक करू शकतात, ते अपडेट करू शकतात आणि मंजुरीसाठी तुमच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवू शकतात.

शिक्षकांच्या प्रोफाइलचे स्वरूप काय आहे ?

शिक्षकाचे प्रोफाइल 2 पृष्ठांमध्ये विभागलेले आहे (फॉर्म):

1. कर्मचार्‍यांचे तपशील - शिक्षकाची वैयक्तिक माहिती (ही माहिती बदलता येणार नाही)

2.नोकरी तपशील - शिक्षकांचे नोकरी-संबंधित तपशील (शिक्षक या फील्डमध्ये बदल करू शकतात)

शिक्षक शिक्षकाच्या प्रोफाइलमध्ये शिक्षण अधिकाऱ्याने ने केलेल्या बदलांशी सहमत नसल्यास काय करावे ?

गट शिक्षण अधिकाऱ्याने केलेल्या बदलांशी सहमत नसल्यास शिक्षक शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करू शकतात.

शिक्षक त्याचे प्रोफाइल किती वेळा बदलू शकतात ?

गट शिक्षण अधिकाऱ्याला प्रोफाइल पाठवण्यापूर्वी शिक्षक फक्त एकदाच फील्ड बदलू शकतात. त्यानंतर, शिक्षक फक्त अपीलसाठी शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवू शकतात, परंतु त्यानंतर प्रोफाइल बदलू शकत नाहीत.

शिक्षण अधिकाऱ्याने प्रोफाइल बदलल्यानंतर शिक्षक त्यांचे प्रोफाइल बदलू शकतात का ?

नाही. प्रोफाईल केवळ शिक्षण अधिकाऱ्याच्या पुनरावलोकनानंतर केवळ 'वाचनीय' मोडमध्ये उपलब्ध आहे.🌹🌹🌹🌹🌹*🚩Online Teacher Transfer Portal🚩*
ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टलचे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. मा. ना.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन  घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 
*या प्रणालीचे वैशिष्टे :-*
*संगणक तथा मोबाईलवर सहज वापरता येते.*

*यामध्ये मोबाईल नंबरने लॉगीन करता येते.* 

*प्रत्येक वेळी स्वतंत्र OTP येतो.*

*त्यामुळे सुरक्षितता अधिक आहे.*

*बदली प्रणालीतील प्रत्येक प्रक्रीये संदर्भात व्हिडीओ बनविण्यात आलेले आहेत.* 

*प्रत्येक सूचना वेळोवेळी इ मेल, व एस. एम. एस.दारे मिळेल.*

*याच्यामध्ये कोणी माहिती बदलण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते. त्यामुळे अधिक सुरक्षितता आहे.* 

*या प्रणालीमध्ये कोणतीही प्रक्रिया पार पडली कि त्या संदर्भात PDF संबंधिताच्या मेलवर प्राप्त होते.* 

*संबंधित बदली प्रक्रियेची वेबसाईट खालील प्रमाणे आहे.*


👈🏻 शिक्षक बदली पोर्टल नवीन वेबसाईट

 OTT.MAHARDD.COM :

👇👇👇 

 *O = ONLINE*

 *T = TEACHER* 

*T = TRANSFER*

*MAHA  = MAHARASHTRA*

*RDD = RURAL DEVELOPMENT DEPARTMENT*


🌹🌹🌹🌹🌹


ग्रामविकास विभागामार्फत होणाऱ्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे.  कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आता या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्याना गती मिळेल. राज्यात आजमितीस जवळपास 2 लाख प्राथमिक शिक्षक असून या प्रणालीमुळे कोणत्याही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून सन 2022 मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या प्रणालीचे अनावरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. 

या कार्यक्रमास ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव का.गो.वळवी, पुणे जिल्हा परिषद सीईओ तथा समिती अध्यक्ष आयुष प्रसाद,  सातारा जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा,पुणे स्मार्ट सीटीचे सीईओ संजय कोलते, जिल्हा परिषद सीईओ वर्धा सचिन ओंबासे, मुंबई मनपा सहआयुक्त अजित कुंभार, एमएमआरडीए सहआयुक्त राहुल कर्डीले, त्याचप्रमाणे आज्ञावली विकसित करणारे विन्सीस आयटी सव्हिसेस आणि साय-फ्युचर इंडिया प्रा.लि.चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
 
मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, नियुक्त अभ्यासगटाने मागील बदली प्रक्रियेत असलेल्या सर्व त्रुटी दूर करून सर्वसमावेशक अशी ऑनलाईन आज्ञावली विकसित केली आहे. पूर्वी शिक्षकांची बदली करताना विविध समस्या निर्माण होत होत्या. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे बदली प्रक्रियाच पारदर्शक होईल. त्याचप्रमाणे आता यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन न होता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  अपर मुख्य सचिव श्री.राजेशकुमार म्हणाले की, या ऑनलाईन प्रणालीद्वारे बदली प्रक्रिया अतिशय सोपी व पारदर्शक झाली आहे. गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशासाठी शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात, त्या आता या संगणकीय प्रणालीमुळे पूर्ण होणार आहे. या संगणकीय प्रणालीत चुकीची माहिती भरल्यास ती अन्य शिक्षकांना पाहता येईल, अशी सुविधा देण्यात आली आहे. ही प्रणाली देशातील कोणत्याही राज्यात नसून या आज्ञावलीला अन्य राज्यातून मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. या अभ्यासगटाने राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी विभागवार भेटी व चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्यक्ष बदल्या करतांना त्यांना बदल्यांसंदर्भात येणाऱ्या अनुभवांचा तौलनिक अभ्यास करून या अभ्यासगटाने आपला अहवाल शासनाला सादर केला. 
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षक संवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ग्रामविकास विभागाच्या 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाद्वारे बदलीचे सुधारित धोरण निश्चित केले आहे. यात विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता, शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना येणाऱ्या अडी-अडचणी आदी विचारात घेण्यात आल्या. 

  आंतरजिल्हा बदली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यास किमान 5 वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षघात, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता तसेच वयाने 53 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी त्याचबरोबर पती-पत्नी एकत्रिकरण आदींची विशेष संवर्ग शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. 

  जिल्हांतर्गत बदली : जिल्हांतर्गत बदली करतांना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण आणि विद्यमान शाळेत 5 वर्षे पूर्ण झाली आहे, अशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हातील अवघड क्षेत्र आणि शाळाची यादी घोषित करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून यासंदर्भात प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता-घटस्फोटीत महिला शिक्षक तसेच व्याधिग्रस्त शिक्षकांबरोबरच पती-पत्नी एकत्रिकरण आदी या विशेष संवर्ग शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे. 

  शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी 6 टप्पे ठरविण्यात आले असून त्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या बदल्यांबाबत अनियमिततेची तक्रार आल्यास त्याचा निपटारा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. 

  या जिल्हा परिषद शिक्षकाची बदली धोरणांची बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. या समितीने निविदा प्रक्रिया राबवून आज्ञावली तयार केली आणि आज या प्रणालीचा प्रत्यक्ष वापर सुरू होत आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा तर वर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांनी आभार मानले.

🌹🌹🌹🌹🌹जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी. निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.

सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून सन २०२२ मधील बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. सदर प्रणालीचे अनावरण गुरुवार, दि.०९ जून २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता मा. मंत्री (ग्रामविकास) महोदयांच्या हस्ते कक्ष क्र. ७०२. सातवा मजला, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात येणार आहे.


🌹🌹🌹🌹🌹

3 जून 2022

बदली बाबत विन्सिस सॉफ्टवेअर कंपनी ने उपस्थित केलेल्या काही प्रश्न, मुद्द्यांचे स्पष्टीकरण...

आपल्या सर्वाना नक्कीच उपयोगी पडतील असे मुद्दे..👇👇👇🌹🌹🌹🌹🌹

1 जून 2022

शिक्षण अधिकारी यांची भूमिका...


🌹🌹🌹🌹🌹

30 मे 2022

Social appeal

सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा ?👇👇👇🌹🌹🌹🌹🌹

27 मे 2022

अवघड क्षेत्र यादी - सातारा जिल्हा


🌹🌹🌹🌹🌹

*26 मे अपडेट्स*


*माननीय गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका काय असेल ⁉️*

*BEO Role‼️‼️*


*Vinsys IT Services कंपनी द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला अधिकृत व्हिडिओ*👆🏻👆🏻👆🏻

🌹🌹🌹🌹🌹

24 मे 2022


*How to fill the form ⁉️*

*माहिती कशी भरावी ⁉️*🌹🌹🌹🌹🌹

22 मे 2022

Vinsys IT Services या कंपनी द्वारे बदली प्रक्रिया होणार असून Online Teacher Transfer portal - phase 1 मधील विविध अधिकारी व शिक्षक यांची भूमिका व जबाबदारी Roles and Responsibilities या व्हिडिओ मधून पहा... 👇


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

22 मे 2022

शिक्षक बदली पोर्टल मध्ये लॉग इन कसे करावे.. खालील व्हिडिओ मधून पहा 👇👇👇🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

22 मे 2022
अवघड क्षेत्र व साधारण क्षेत्र - 2022
सविस्तर माहिती सांगणारा व्हिडीओ खाली पहा.👇👇👇🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


20 मे 2022

बदलीची शक्यता वाढली


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


17 मे 2022

*शिक्षक बदली update*

शिक्षक बदली प्रक्रिया 3 Phase मध्ये होणार
1) Phase 1 : शिक्षक माहिती updation
2) Phase 2 : आंतरजिल्हा बदली
3) Phase 3 : जिल्हांतर्गत बदली

आता लवकरच *Phase 1* सुरू होत आहे. Phase 1 पूर्ण झाल्यानंतरच Phase 2    व 3 सुरू होईल.

*Phase 1*.मध्ये खालील प्रकारे प्रक्रिया असेल
🏵️ शिक्षकांना त्यांचा मोबाईल नं व OTP ने लाँगीन करावं लागेल
🏵️ तिथे आपणास शिक्षक माहिती चे दोन भाग दिसतील
I) Personal Information 
ii) Employee Information
🏵️ Personal Information *read only* Mode मध्ये असेल तिथे आपणास बदल करता येणार नाही.
🏵️ Employee information मध्ये माहिती बरोबर असल्यास माहिती accept करावी. व त्रुटी दिसल्यास दुरुस्ती करावी व submit करावी.
🏵️ Submit केलेली माहिती BEO level ला जाईल. BEO सेवापूस्तकां नुसार माहिती तपासून approved करतील. तसेच आलेली माहिती चूक आढळल्यास दुरुस्ती करतील.
🏵️ सदर माहिती शिक्षक लाँगीन ला दिसेल. ती माहिती बरोबर असल्यास शिक्षकांनी accept करावी.
🏵️ BEO यांनी दुरुस्ती केलेली माहिती योग्य असल्यास Accept करावे. माहिती मान्य नसल्यास शिक्षक आपली माहिती मध्ये बदल करुन EO कडे अपील करु शकतील.
🏵️ EO कडे आलेली माहिती, EO योग्य पुराव्यानिशी माहिती approved किंवा बदल करतील.
🏵️ EO नी मंजूर केलेली माहिती आता final असेल.
🏵️ तसेच सर्व शिक्षकांची माहिती सुद्धा प्रत्येक शिक्षकांना आपल्या login मध्ये बघता येईल. एखाद्या शिक्षकांस दुसऱ्या एखाद्या शिक्षकांच्या माहिती मध्ये दोष दिसल्यास त्यांच्या विरोधात CEO कडे Social अपील करता येईल. CEO योग्य पुराव्यानिशी सदर शिक्षकांच्या माहिती मध्ये योग्य बदल करतील.

अशा प्रकारे Phase 1 प्रत्येक शिक्षकांना दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करणे आहे. 
@ अंतिम दिनांक पर्यंत शिक्षकांनी आपली माहिती Accept न केल्यास BEO आपल्या अधिकाराचा वापर करून सर्व शिक्षकांची माहिती approved करतील. त्यांनंतर शिक्षकांना आपली माहिती update करण्याची संधी असणार नाही.
@ प्रत्येक क्षणी व प्रत्येक स्तरावर माहिती update करतांना OTP आवश्यक असणार आहे.
@ बदली प्रक्रियेत कुठल्या स्तरावर काय कसे बदल केले याची संपूर्ण माहिती शिक्षकांना email वर तसेच login मध्ये कळेल.


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

प्राथमिक शिक्षक बदल्या 2022 मधील मोबाईल अँप फेज -1 माहितीपत्रक याबाबत आमचे मित्र ज्ञानेश्वर जाधव, कडेगाव यांनी यूट्यूब लाईव्ह द्वारे सविस्तर चर्चा केली आहे. जरूर पहा. सर्व शंका कुशंका निरसन होतील.🙏🏻🙏🏻🙏🏻


2022 मधील बदल्या या नवीन सॉफ्टवेअर द्वारे मोबाईल अँप ने होणार आहेत.
त्यातील फेज 1 बाबतचे सविस्तर माहितीपत्रक प्रसिद्ध झाले आहे. त्यात दिलेल्या क्रमाने मोबाईल अँप वापरायचे आहे..

खालील लिंक वापरून फेज 1 माहितीपत्रक डाउनलोड करा.🙏🏻🙏🏻🙏🏻


प्राथमिक शिक्षक बदल्या 31मे ऐवजी 30 जून या तारखेस अनुसरून करणेबाबत GR (4 मे 2022)


🙏🏻🙏🏻🙏🏻


शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये ऑफ लाईन बदली 15/07/2020 Download


🙏🏻🙏🏻🙏🏻


जिल्हांतर्गत बदली All GR (सौजन्य: प्रदीप कुंभार) 27/02/2017  Download


🙏🏻🙏🏻🙏🏻


Unfit for ladies 15/02/2018 Download


🙏🏻🙏🏻🙏🏻


बदली जि प सातारा १८/०७/२०२० Download

🙏🏻🙏🏻🙏🏻


बदली प्राधान्यक्रम Download

🙏🏻🙏🏻🙏🏻शिक्षक बदल्या 2022*


👉 *VC 17.03.22 मधील महत्त्वाचे अपडेट*
1) UDSIE अपडेट व दुरुस्ती करणे. 25 मार्च

2) शाळा नोंदणी व दुरुस्ती. 25 मार्च

3) शिक्षक डाटा चेक करणे 25 मार्च

4) *अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करणे. 1 एप्रिल*

5) user testing 1 एप्रिल

6) समानीकरण धोरण जाहीर करणे 25 एप्रिल

7) रोस्टर अपडेट करणे. 15 एप्रिल

8) *आंतरजिल्हा बदली आदेश - बदली होईपर्यंत / सेवानिवृत्त होईपर्यंत वैध राहील.*

9) आंतरजिल्हा बदलीने *कार्यमुक्ती साठी 10% ची अट राहील.*

➖➖➖➖➖➖➖➖


🙏🏻🙏🏻🙏🏻


 (सदर माहिती संग्रहित असून आपल्या सोईसाठी आहे.वेळोवेळी होणारे बदल आपणास कळवले जातील.नियमित ब्लॉगवर अपडेट्स पाहत राहावे.) (माहिती संग्रहित असून आपल्याला सेवेसाठी साभार)🙏🏻🙏🏻बदली माहिती तयार करताना खालील सुचनांचे पालन करावे.१. माहिती अतिशय काळजीपूर्वीक दुरुस्त केली जावी व अचूक भरावी.

२. सर्व महिती English मध्येच भरावी. 

३. ज्या Cell मध्ये दुरुस्ती अथवा बदल केला असेल त्याचे Background Yellow करावे. एखाद्या

बदलून आलेल्या शिक्षकाचे नाव नव्याने समाविष्ट केले असेल तर Background Red करावे. Saral ID या रकान्यापासून पुढील रकान्यात नव्याने माहिती भरावी लागत असल्याने त्यांचे Background बदलण्याची आवश्यकता नाही.

४. सर्व नावांची सुरुवात प्रथम नावाने असून नावाचे स्पेलिंग अचूक तपासावे बदल असल्यास योग्य ती दुरुस्ती करावी.५. जन्म दिनांक (DOB) तसेच माहितीमधील सर्व तारखांचे कॉलम भरण्यापूर्वी ते अचूक असल्याची खात्री •करावी तसेच कामकाजास सुरूवात करण्यापूर्वी आपल्या संगणकाचा Date Format DD-MM VVVY करुन घ्यावा. म्हणजे दिनांक व महिना यांचा क्रम उलटा (MM-DD-YYYY) होणार नाही. ६. GENDER काळजीपूर्वक पहावे व योग्य ती दुरुस्ती करावी.

७. MARITIAL STATUS मध्ये MARRIED / UNMARRIED यापैकी एक लिहावे. ८. CELL NO मध्ये वापरातील व आधारकार्डशी संलग्न असलेला १० अंकी अचूक मोबाईल क्रमांक नोंदवला आहे का ते पहावे. आवश्यकता असल्यास बदल करावा.

९. Adhaar Number रकान्यात बारा अंकी अचूक Adhaar Number नमुद केला आहे का ते तपासावे. योग्य ती दुरुस्ती करावी.

१०. PAN NO मधील एकुण अंक व अक्षरांची संख्या १० असते. त्यात सुरूवातीचे पाच अक्षरे (Capital) त्यानंतर चार अंक व शेवटी पुन्हा एक अक्षर (Capital) असते. ११. EMAIL ID हा वापरातील, संबंधीतास पासवर्ड ज्ञात असलेला व अचूक नमुद करावा.१२. SHALARTH ID मध्ये कोणताही बदल करु नये. बाहेरून बदली होऊन आलेल्या शिक्षकांचाSHALARTH ID हा शालार्थ वेतन प्रणालीवर खात्री करुन नंतरच नोंदवावा. 

१३. Date of Appointment तपासताना मुद्दा क्रमांक ५ वाचावा. येथे मुळ सलग सेवा दिनांक अपेक्षीत

आहे.१४.EMP SERVICE END DATE तपासताना मुद्दा क्रमांक ५ वाचावा. १५. UDISE हा शिक्षकाच्या सध्याच्या शाळेचा व 10 अंकी अचूक आहे का याची खात्री करावी.१६. DESIG DESC मध्ये Headmaster / Graduate Teacher std (68) / Under GraduateTeacher std (1-4/5) या पैकी एक अचूकपणे नमुद करावे. १७.DESIGNATEACHINGION TEACHINGYPE मध्ये सर्वांसाठी TEACHING असे

आवश्यक आहे. १८. Current school name सध्याच्या शाळेचे नाव आहे का ते तपासावे बदल असल्यास UDISE प्रमाणे

अचूक नाव नोंदवावे व UDISE च्या रकान्यातही योग्य तो बदल करावा.

१९. शाळेचे नाव बदलल्यास VILLAGE रकाण्यात योग्य ती दुरुस्ती करावी.२०. QUALIFICATION मध्ये शैक्षणिक पात्रता व MORE QUALIFICATION मध्ये व्यावसायीक

पात्रता तपासून घ्यावी व बदल असल्यास नमुद करावा.२०. QUALIFICATION मध्ये शैक्षणिक पात्रता व MORE QUALIFICATION मध्ये व्यावसायीक पात्रता तपासून घ्यावी व बदल असल्यास नमुद करावा.२१. ADDRESS BUILDING ADDRESS STREET LANDMARK, LOCALITY व विशेषतः PINCODE अचूक तपासावा योग्य तो बदल करावा. २२. या पूढील सर्व रकान्यात नव्याने माहिती नोंदवायची आहे. Saral ID सात अंको असतो तो अचूक

नोंदवावा या Cell ला Text Format करु नये तसेच सुरूवातीला शुन्य येण्यासाठी अंका व्यतीरीक्त कोणतेही चिन्ह टाकू नये. (सुरुवातील शुन्य नाही आला तरी चालेल) २३. Cast Category मध्ये SC/ST/VJA / NTB/ NTC/NTD/OBC/OPEN या पैकी जे योग्य असेल ते नमुद करावे.२४. Teaching Medium मध्ये Marathi / Urdu यापैकी अचूक असेल ते नोंदवावे. 


२४. Teaching Medium मध्ये Marathi / Urdu यापैकी अचूक असेल ते नोंदवावे. 

२५. Teacher Type मध्ये Headmaster / Graduate Teacher std (68) / Under Graduate

Teacher std ( 1-4/5) या पैकी एक अचूकपणे नमुद करावे. २६. Teacher Specialization या रकाण्यात Graduate Teacher std (6-8) साठी Science /Language/ Social Science & Headmaster/ Under Graduate Teacher std(14/5 ) यांच्यासाठी All Subjects असे नोंदवावे. २७. Appointment Category मध्ये नियुक्तीचा प्रवर्ग SC/ST/VJA/ NTB/ NTC / NTD /

OBC/ OPEN या पैकी जे योग्य असेल तो नमुद करावा.२८. Service type मध्ये Permanent/ Temporary जे योग्य असेल ते नोंदवावे.२९. Confirmation date स्थाईत्व दिनांक नोंदवावी मुद्दा क्रमांक ५ वाचावा. ३०. Total Service years दि ३१/०५/२०२२ अखेरीच एकुण सेवा DD-MM-YY या Format मध्ये नमुद करावी.३१. Last Transfer category या रकाण्यात या पूर्वी सरल प्रणालीद्वारे बदली झाली असल्यास SPI/SP2 / TBR / TUC या पैको एक अथवा बदली झाली नसल्यास NA असे नमुद करावे.३२.Last working date in difficult area या रकान्यात या पूर्वी अवघड क्षेत्रात काम केले असल्यास

सर्वसाधारण क्षेत्रातील हजर दिनांक नमुद करवा. या पूर्वी अवघड क्षेत्रात काम केले नसल्यास सदरचा रकाना रिक्त ठेवावा. सदर रकाना भरताना मुद्दा क्रमांक ५ वाचावा.३३.Current School joining date सध्याच्या शाळेतील हजर दिनांक नोंदवावा, सदर रकाना भरताना मुद्दा क्रमांक ५ वाचावा. ३४. Current school UDISE सध्याच्या शाळेचा १० अकी अचूक UDISE क्रमांक नोंदवावा.३५.Current district joining date सदर रकाना भरताना शिक्षक अंतर जिल्हा बदली नसल्यास Date of Appointment याच रकाण्यातील दिनांक भरावी जर शिक्षक अंतर जिल्हा बदलीने हजर झाला असेल तर सध्याच्या जिल्हातील हजर दिनांक भरावी (याबाबत आपसी अंजिब सेवाजष्ठतेचा शासन आदेश बाचावा.) Current district joining date व Date of Appointment या दोन दिनांकात बदल असल्यास संबंधीत शिक्षक अंजिव ने हजर झाला आहे असे समजण्यात येईल. सदर रकाना भरताना मुद्दा क्रमांक ५ वाचावा.(या पद्धतीने आपली माहिती तपासावी.)

24 comments:

 1. खूप छान ब्लॉग आहे कर्पे सर

  ReplyDelete
 2. शिक्षक आणि विद्यार्थी यांना शिक्षणासाठी खूप उपयोगी असा ब्लॉग आहे.

  ReplyDelete
 3. Tumcha badli group Kasa join karaycha

  ReplyDelete
 4. खूप छान ब्लॉग आहे सर सर्व शुद्धी पत्रक मिळाले तर अजून बर होईल

  ReplyDelete
 5. अवघड क्षेत्रात दहा पेक्षा जास्त वर्षे सलग सेवा झाली असेल तर, बदली पात्र होणार का?

  ReplyDelete
 6. सर ऑनलाईन झालेली आंतरजिल्हा बदली रद करणयासाठी सर्व शासन निर्णय हवे आहेत...

  ReplyDelete
 7. अवघड क्षेत्रात 20 वर्ष सेवा झाली व सोप्या क्षेत्रात 5 वर्ष सेवा झाली तर बदली होईल का किवा सोप्या क्षेत्रात 10 वर्ष बदली होणार नाही का?

  ReplyDelete
 8. खुप छान ब्लॉग सर जी

  ReplyDelete
 9. अवघड क्षेत्र माहित करुन द्यावे कृपया

  ReplyDelete
 10. सर विस्थापित बदल्या होणार आहेत का

  ReplyDelete
 11. खूपच उपयोगी माहिती.

  ReplyDelete
 12. कोणत्या संवर्गातुन बदली पाहिजे असा उल्लेख कुठेच आला नाही

  ReplyDelete
 13. खुप छान माहिती

  ReplyDelete
 14. 1nocअसल्यास कुठे भराचे सर

  ReplyDelete
 15. सर्वसामान्य शिक्षक यांना सहज समजेल असे विश्लेषण..... 👍👍

  ReplyDelete
 16. Nice information sir 👍

  ReplyDelete
 17. बदली संवर्ग नविन कसा टाकावा

  ReplyDelete
 18. सर खुपच छान माहिति ,मला संकलित वेळापत्रक पाहिजे होते,वर्ग 5 ते 7 चे . 9 तासाचे

  ReplyDelete
 19. बदल्या होतील का नक्की???? 31 ऑगस्ट पर्यंत अजून मुदतवाढ?? असाच होत राहील तर वर्ष लागेल बदल्या साठी

  ReplyDelete
 20. ही यादी आउटगोइंग शिक्षकांची आहे का सर? आणखी यादी येणे बाकी आहे का?

  ReplyDelete
 21. सातारा जिल्हा परिषद आंतरजिल्हा बदली शिक्षकांना ब्यंककर्ज भरल्याशिवाय कार्य मुक्त करू नये असा आदेश काढले ९० टके शिकक्षकाचे कर्ज आहे मार्गदसन व्हावे

  ReplyDelete
 22. संवर्ग 2ला बदलीहोण्याच्या अगोदरच्या (पूर्वीच्या)रीक्त जागा दाखवतात का?जसे retired person vacant ,place

  ReplyDelete

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...