TAIT परीक्षा








शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल जाहीर २०२३ | Tait exam result 2023 maharashtra date


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद च्या ऑफिसीएल वेबसाईटवर 'टेट' परीक्षेचा ( Tait result 2023 maharashtra ) निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर होणार आहे असे प्रसिद्ध करण्यात आले आहे प्रसिद्धी पत्रक चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



Tait चा निकाल कसा चेक करावा ? How to check Maha Tait result 2023
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT 2023 परीक्षेचा निकाल ( Tait result 2023 date maharashtra ) 24 मार्च 2023 रोजी लागणार असून याची अधिकृत घोषणा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे mscepune या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डेट परीक्षेचा निकाल कसा चेक करावा याची थोडक्यात स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे
Tait 2023 निकाल चेक करण्यासाठी या स्टेप्स वापरा. 



सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या अधिकृत वेबसाईट www.mscepune.in/ वर जायचं आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2023 या टॅबवर क्लिक करायचं आहे.
ओपन झालेल्या टॅबवर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2023 - निकाल डाऊनलोड वेबलिंक वर क्लिक करायचं आहे.
ओपन झालेल्या पेजवर आपला एप्लिकेशन ID, Password/ Date of Birth टाकायचं आहे.
सबमिट केल्यानंतर आपला निकाल दिसेल. हा निकाल पुढील प्रोसेस साठी डाऊनलोड करून किंवा प्रिंट करून जपून ठेवा.
निकाल डाऊनलोड झाल्यानंतर आपली माहिती नक्की चेक करायला विसरू नका. यामध्ये नाव, आडनाव, आईचे नाव, आपले मार्क्स नक्की चेक करा.
Tait 2023 निकाल लागल्या नंतर ची प्रोसिजर -
Tait result 2023 चा निकाल लागल्या नंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि एप्रिल-मे महिन्यांत खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमधील शिक्षकांची भरती केली जाणार आहे. एकाचवेळी साधारणतः ३२ हजार ३०० शिक्षकांची भरती होणार आहे. पंधरा वर्षांतील ही सर्वात मोठी भरती असल्याची माहिती शिक्षण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली...



सेवानिवृत्ती, आकाली मृत्यू, पटसंख्या वाढ, स्वेच्छानिवृत्ती अशा विविध कारणांमुळे राज्यातील एक लाख शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे वाढली आहेत. मागील सहा वर्षांत शिक्षक भरती न झाल्याने आता रिक्त पदे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दोन लाख ४० हजार उमेदवारांची ऑनलाइन 'टेट' परीक्षा नुकतीच पार पडली. त्याचा निकाल २४ मार्चपूर्वी जाहीर केला जाईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त महेश पालकर यांनी दिली

'टेट' निकालानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद व महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीसाठी मेरिट यादीनुसार उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये थेट नियुक्ती मिळणार आहे. दुसरीकडे अनुदानित शाळा महाविद्यालयातील  शिक्षकांसाठी "एका जागेसाठी दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे. मुलाखतीतून त्यातील एका उमेदवाराची निवड केली जाईल, खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना दहापैकी कोणत्या उमेदवाराला घ्यायचे हा अधिकार त्या संस्थेचा असणार आहे.











अभियोग्यता चाचणी बुधवारपासून, प्रवेशपत्र उपलब्ध झाले!। Maha TAIT 2023 Admit Card Download


अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणीला बुधवार पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठीचे हॉल तिकीट सोमवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षेसाठी तब्बल २ लाख ३९ हजार ७२६ उमेदवारांची नोंदणी झाली असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरतीचा शासन निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला, त्यामुळे आता नव्याने होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

अर्थात टीईटी आणि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे. २०१७ मध्ये पहिली अभियोग्यता परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी १ लाख ९१ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ७२ हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थिती लावली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षाच झाली नव्हती. शिक्षक भरतीकडे आस लावून बसलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेण्याबाबतची मागणी शालेय शिक्षण विभागाकडे अनेकदा केली होती. अखेर त्याची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. परीक्षेचे ऑनलाइन प्रवेशपत्र २० फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी दररोज दोन बॅचेस करण्यात येणार आहेत.





Maha TAIT परीक्षेसंदर्भातील महत्वाच्या सूचना 

1.सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या स्थळात (Site) प्रवेश करण्यासाठी आपणास दिलेला यूजर आई डी / पासवर्ड नमूद करावा लागेल.



 संगणकाच्या पडद्यावर दिसणारे तुमचे नांव आणि इतर तपशील बरोबर आहे याची पडताळणी करावी. आपणास उपलब्ध करुन देण्यात आलेला यूजर आई डी / पासवर्ड बाबत गुप्तता पाळणे आवश्यक आहे.




2.कृपया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिकटवलेले हे प्रवेशपत्र आणि सद्य स्थितीत वैध असे मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे. प्रवेशपत्रावर असणारे नाव (ऑनलाईन नोंदणीच्यावेळी जे उमेदवाराने दिलेले असेल) व ओळखपत्रावरील नमूद असलेल्या नावाशी तंतोतंत जुळावयास हवे. विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले/मधले/अंतिम नाव बदलले आहे त्यांनी हयाची खास दखल घ्यावी. जर प्रवेश पत्रावरील फोटो/नाव आणि ओळखपत्रावरील फोटोत/नावात कोणताही फरक असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल, अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना/विवाह प्रमाणपत्र/शपथपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेस बसण्यास अनुमती देण्यात येईल.



3.बायोमेट्रिक डाटा (अंगठय़ाचा ठसा) आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल. बायोमेट्रिक डाटा च्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय (जुळतो अथवा जुळत नाही) MSCE चा असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल. बायोमैट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास/सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या :

(क)जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि परिक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.



(ख)जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (Finger prints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोटं सुकली आहेत याची खात्री करून घ्या.



(ग)दोन्ही हातांची बोट सुकलेली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पूसा.

(घ)ठसा घेतल्या जाणा-या अंगठय़ाला जर जखम/मार लागला असेल तर त्वरित परिक्षा केंद्रावर संबंधित अधिका-यास कळवा.



(या मुद्यांचे पालन करण्यास उमेदवार असमर्थ ठरल्यास परिक्षेस बसु दिले जाणार नाही.)



4.परीक्षेच्या स्वरुपाबद्दल माहिती/सूचना देणारी पुस्तिका (Information Handout) MSCE च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर माहिती पुस्तिका संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन त्याचे अध्ययन करावे.5.पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत उमेदवारांनी प्रवेशपत्रावर विहित ठिकाणी त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा स्पष्टपणे उमटवावा व स्वाक्षरी करावी.

6.उमेदवाराने सोबत बॉल पॉइंट पेन आणावयाचे आहे. उमेदवार आपल्यासोबत स्वतःचे स्टँप पॅड आणू शकतात. कच्चे काम करण्यासाठी कागद पुरवला जाईल. परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेले कागद प्रवेश पत्रासह पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागतील.

7.तुम्हाला वर नमूद केलेल्या ऑनलाईन परिक्षेस बसण्यासाठी तुमचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. ची सत्यता न तपासता अनुमति देण्यात आली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी MSCE ची सर्व पात्रता व निकष पूर्ण करतो हे पडताळून बघण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची राहील.

8.बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतीबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे (उत्तरांचे) अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण केले जाईल. ह्या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पध्दतीमध्ये जर का असे अनुमान निघाले/आढळून आले की, प्रतिसादांचे आदान प्रदान झालेले आहे अणि मिळवलेले गुण हे यथार्थ/स्विकारण्यायोग्य नाहीत, तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

9.हया प्रवेशपत्रावर छापलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उमेदवारास परीक्षास्थानी यावयास हवे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बसू दिले जाणार नाही.

10.पुस्तके, वह्या, परिगणक यंत्र (Calculator), पेजर, मोबाईल फोन इत्यादी प्रकारची साधने/साहित्य परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतःजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. सदर नमूद केलेली अनधिकृत साधन/साहित्य परीक्षेच्यावेळी संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन/साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, याची नोंद घ्यावी.

11.परीक्षेचा दिनांक / सत्र / परीक्षा स्थान यामधील कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही.

12.सदर प्रवेशपत्र म्हणजे MSCE द्वारे प्रवेशाची हमी नव्हे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

13.उमेदवाराच्या निवडी संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय दबाव अशामुळे उमेदवारास अपात्र समजले जाईल.

14.कृपया नोंद घ्यावी की कोणताही उमेदवार परीक्षेसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो/ते. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारांना प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या दिवशी व वेळी एकदाच परीक्षेस उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो. उर्वरीत सर्व प्रवेशपत्रे उमेदवारांना परत करावी लागतील.

15.परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये ऐनवेळीस काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही. अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेहून दुसऱ्या जागेस हलविणे किंवा परीक्षेस विलंब होणे गृहित आहे. पुन्हा परीक्षा घेणे याबाबतचा निर्णय हा परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा/मंडळाचा अंतिम राहील. उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करणार नाही. या विलंबीत झालेल्या प्रक्रियेस उमेदवार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलण्यास तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेमधुन संपूर्णपणे वगळण्यात येईल.

16.परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती, संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे, प्रकाशित करणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रांसमिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण आणि जमा करणारे किंवा परिक्षा केंद्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणारे, किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

17.अपंग व्यक्तिंनी (PwBD) त्यांच्या व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परिक्षेच्या 30 मिनिटे आधी चाचणी केंद्र प्रशासकांशी संपर्क साधावा.

18.पुढील पानावर दिलेल्या सामाजिक अंतर परीक्षा संबधीच्या सूचना वाचा.


विभाग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे

परीक्षा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) हॉल तिकीट, प्रवेशपत्रे

प्राथमिक शिक्षक पदाचे नाव

माध्यमिक शिक्षक

रिक्त पदे 30000 अंदाजे.

महा TAIT परीक्षेच्या तारखा 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023

श्रेणी प्रवेशपत्र / हॉल तिकीट

महा टैट हॉल तिकीट 2023 प्रकाशन तारीख 19 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाइट www.mscepune.in

महा TAIT 2023 हॉल तिकीट डाउनलोड लिंक

उमेदवारांना प्रथम www.mscepune.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल

वेबसाइटचे होम पेज तुमच्या स्क्रीनवर दिसल्यानंतर अॅडमिट कार्ड 2023 लिंक शोधा.

त्यानंतर, लिंकमध्ये तुमचा नोंदणी आयडी आणि डीओबी/पासवर्ड टाका.

दिलेला कॅप्चा पेजवर टाका.

परीक्षेचे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुमच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेले सर्व तपशील तपासा.

तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.


महा TAIT 2023 परीक्षेचा नमुना

TAIT परीक्षेत CBT मध्ये एकूण 200 MCQ असतील, उमेदवारांना खालील तक्त्यावर जाण्यासाठी आणि महा TAIT 2023 परीक्षेच्या पॅटर्नबद्दल अधिक तपशील मिळविण्यासाठी 120 मिनिटांचा परीक्षेचा कालावधी मिळेल.

S. No. विषयांचे MCQ गुण

1. इंग्रजी भाषा 15 15

2. मराठी भाषा 15 15

3. सामान्य ज्ञान 30 30

4. बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र 30 30

5. परिमाणात्मक योग्यता 30 30

6. तर्क क्षमता 80 80

एकूण 150 गुण




ऑनलाइन परीक्षा दिनांक : २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान

हॉलतिकिट मिळणार :उपलब्ध झाले आहेत, लिंक खाली दिलेली आहे

२०२३ परीक्षेसाठी झालेली नोंदणी : २३९७२६



२०१७ मध्ये झालेली नोंदणी : १९७०००


डाउनलोड करा 👇👇👇

TAIT परीक्षा संपूर्ण माहितीपत्रक

1👇



2👇

3👇

4👇

5👇

6👇




१. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२' या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत.


अ.क्र.



तपशील
विहित कालावधी
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक


https://ibpsonline.ibps.in/mscepjan 23/

ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी
दिनांक ३१/०१/२०२३ ते दिनांक ०८/०२/२०२३ दि. ०८/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत.


ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क
भरण्याकरीता अंतिम दिनांक
प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा
दिनांक १५/०२/२०२३ पासून
कालावधी
ऑनलाईन परीक्षा दिनांक
दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)



५.
२. उपलब्ध पदसंख्या : राज्यातील शिक्षण सेवकांच्या / शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावली नुसार 'पवित्र' (PAVITRA-Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे प्रसिध्द करण्यात येईल.
३. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः
३.१ परीक्षेचे माध्यम : परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न व्दिभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी - मराठी अथवा इंग्रजी- उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे.
३.२ अभ्यासक्रम:
सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.
अ.क्र.
घटक
शेकडा प्रमाण
एकूण गुण
एकूण प्रश्न

६० %
१२०
१२०
अभियोग्यता
बुध्दिमत्ता

४०%
८०
८०
एकुण
१००%
२००
२००
अ) अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तीमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.


(a) बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.


सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्टस्तर मर्यादा असणार नाही.


क) परीक्षा कालावधी : परीक्षेसाठी दोन तासांचा ( १२० मिनिट) कालावधी राहील.


४. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी:


४. १ नियुक्त करावयाच्या रिक्त पदांचा सामाजिक/ समांतर आरक्षण, अध्यापनाच्या विषयाच्या रिक्त पदांबाबतचा तपशील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी व्यवस्थापन यांच्या पवित्र प्रणालीवरील जाहीरातीनुसार राहील.


४.२ विविध मागास प्रवर्ग, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणान्या आदेशानुसार राहील.


४.३ महिलांसाठी आरक्षित पदाकरीता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच नॉनक्रीमीलेअर (non creamy layer) मध्ये मोडत असल्याबाबत (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.


४.४ ऑनलाईन अर्ज करतांना एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवारांकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात/ जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.


४.५ समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही- १०१२/प्र.क्र.१६/१२/१६ अ, दि. २३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकिर्ण- १११८ / प्र.क्र.३९/१६-अ, दिनांक १९ डिसेंबर, २०१८ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.


४.६ आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील (ईडब्लूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: राआधी- ४०१९/प्र.क्र. ३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ व दिनांक ३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.


 ४.७ अद्ययावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र / आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून
सक्षम प्राधिकाऱ्याने वितरीत केलेले व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे
प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.


४.८ आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.


४.९ आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी सवलतींचा दावा करणा-या उमेदवारांकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.


४.१० खेळाडूसाठीचे आरक्षण शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीधो- २००२/प्र.क्र.६७/ क्रियुसे-२, दिनांक १ जुलै २०१६ तसचे शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र.६७/ क्रियुसे-२, दि. १८ ऑगस्ट २०१६, शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक: संकिर्ण- १७१६/प्र.क्र.१८/क्रीयुसो-२, दि. ३० जून २०२२ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादा सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.



प्रावीण्यप्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.



४.१९ दिव्यांग आरक्षण: दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र.दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६ अ दि. २९ मे २०१९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र. अप्रकि- २०१८/प्र.क्र. ४६ / आरोग्य-६, दि. १४ सप्टेंबर २०१८ मधील आदेशानुसार केंद्रशासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.


४.१२ अनाथ आरक्षण: अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्र. : अनाथ - २०१८/ प्र.क्र. १८२ / का-०३, दि. २३ ऑगस्ट २०२१ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील..


४. १३ माजी सैनिक आरक्षणः उमेदवार माजी सैनिक स्वतः तसेच शहीद सैनिकांचे कुटुंबीय असल्यास त्यांनी त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यास अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत. माजी सैनिकाकरीता आरक्षणा संदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील.


४.१४ प्रकल्पग्रस्त आरक्षण: शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. एईएम-१०८०/३५/१६-अ, दि.
२०/०१/१९८० तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमुद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार
प्रकल्पग्रस्तासाठीचे आरक्षण राहील.


४.१५ भूकंपग्रस्त आरक्षण: शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. भूकंप- २००९/प्र.क्र. २०७/२००९/१६- अ, दि. २७/०८/२००९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार भूकंपग्रस्ताचे आरक्षण राहील.


४.१६ पदवीधर अंशकालिन कर्मचारी आरक्षण : शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. पअंक- १००९/प्र.क्र.२००/२००९/१६-अ, दि. २७/१०/२००९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार पदवीधर अंशकालिन कर्मचारी आरक्षण राहील.



५. उमेदवारांची पात्रता-


५.१ भारतीय नागरीकत्व


५. २ वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहित करील, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना/ शिक्षकांना लागू होईल.


५.३ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१८/प्र.क्र.३९७/ टीएनटी-१, दि. ०७ फेब्रुवारी २०१९, शासन शुध्दीपत्रक २५ फेब्रुवारी २०१९, १६ मे २०१९, १२ जून २०१९ तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.


प्रस्तुत जाहीरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/ टीएनटी ०१. दि. १०/११/२०२२ अनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणान्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होणे अनिवार्य राहील.

उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.


६. निवड प्रक्रियाः परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील (प्राथमिक/ उच्च प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक/ अध्यापक विद्यालय/ रात्र शाळा) पद भरतीसाठी ग्राहय धरण्यात येतील.


शिक्षण सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. सी.ई.टी. २०१५/प्र.क्र. १४९/ टीएनटी-१, दि. ०७/०२/२०१९, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/ टीएनटी-१, दि. १०/११/२०२२ तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राहील.


७. ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दतः


७.१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या

https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/


या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.


७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.


७.३ ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.



(अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी X ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. आकारमान 200X300 pixels
फाईल साईज 20kb 50कब



(ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढन्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे. आकारमान 140 X 60 pixels
फाईल साईज 10kb 20कब



(क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी x ३ सेमीपांढऱ्या कागदावर काळया / निळयाशाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या
हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.


आकारमान 240 X 240 pixels in 200 DPI
फाईल साईज 20kb 50kb
स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व- हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया / निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.


आकारमान 800X400 pixels in 200 DPI
फाईल साईज 50kb 100 kb .


स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा


 'नमूना
(Name of the candidate), hereby declare that all
"I,
the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required."


सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. ( लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)



७. ४ परीक्षेचे शुल्क :


१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-


२. मागासवर्गीय / आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-


३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.


४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. ५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.


७.५ जिल्हा / परीक्षा केंद्र निवडः अर्ज सादर करतांना ३ (तीन) जिल्हा/परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. जिल्हा/ परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा/ परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा / परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.


८. प्रवेशपत्र :


८.१ परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.


८.२ परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतः चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स या पैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही नावामध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये.

९. परीक्षेस प्रवेश :


९.९ फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सुचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षाकक्षात प्रवेश देण्यात येईल.


९. २ स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचारसाधने म्हणून वापरण्यायोग्य कोणत्याही वस्तू, कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वहया, नोट्स, पुस्तके, बॅग्ज, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने / साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतःजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य उमेदवारांनी आणल्यास ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अथवा परीक्षा केंद्र व्यवस्थापन अथवा परीक्षा आयोजक जबाबदार राहणार नाहीत.


१०. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती / जाहिरात
अधिकृत समजण्यात येईल.

१९. सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


१२. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास msce.tait2022@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल.


No comments:

Post a Comment

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...