नवीन कर रचना व अर्थ संकल्प





केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.


 त्यामध्ये यंदाचं बजेट हे सात घटकांवर म्हणजे सप्तर्षीवर आधारित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.



अर्थसंल्पाचे सात प्राधान्यक्रम-

 सप्तर्षी


1.सर्वसमावेशक विकास


2. शेवटच्या घटकापर्यंत विकास


3. पायाभूत सुविधांचा विकास


4. क्षमतांमध्ये वाढ करणे


5. ग्रीन ग्रोथ


6. युवाशक्ती


7. आर्थिक क्षेत्र


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज अर्थसंकल्प मांडला.

 येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा आज शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प आहे.


 मोदी सरकारचा हा एकूण नववा अर्थसंकल्प आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीचा तसेच या वर्षात आठ ते दहा राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.



बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी काय?


- कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा


- हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे


- स्वयंपूर्ण स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी 2200 कोटी रुपयांची घोषणा


- कापसासाठी क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजनेची घोषणा


- पोषण, अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल


- कृषी स्टार्टअप्स निर्माणर सरकारचा भर. भारताला बाजरींचे जागतिक केंद्र बनविण्यावर भर.


- बचत गटांवर भर देऊन आर्थिक सक्षमीकरणावर सरकारचा भर असेल.


- सरकार कृषी क्षेत्रासाठी साठवण क्षमता- गोडाऊन वाढवणार आहे


- FY24 मध्ये कृषी कर्जाचे लक्ष्य 11.1% ने वाढून 20 लाख कोटी रुपये होईल


- पशुसंवर्धन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय क्षेत्राला कर्ज देण्यावर भर द्या


- खाजगी क्षेत्रातील R&D टीमसोबतही काम करेल


- बाजरीसाठी जागतिक स्तरावरील संशोधन संस्था बनवणार


करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.


Budget 2023 New Income Tax : नवीन कर उत्पन्न मर्यादा किती?👇👇


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात टॅक्स स्लॅबबाबत घोषणा केली.

आता, सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.


उत्पन्न प्राप्तिकर
0 ते तीन लाख - 0 टक्के
3 ते 6 लाख - 5 टक्के
6 ते 9 लाख - 10 टक्के
9 ते 12 लाख - 15 टक्के
12 ते 15 लाख - 20 टक्के
15 लाख हून अधिक - 30 टक्के



प्राप्तिकर सवलत मर्यादा 2.50 लाखांवरून 5 लाख करण्याची आवश्यकता आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.


मागील काही वर्षांपासून टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.


 सरकारकडून टॅक्सबेस वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आयकर रिटर्न दाखल करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.


सरकारने टॅक्स स्लॅब वाढवला तर करदाते वाचणाऱ्या पैशातून खरेदीकडे, गुंतवणुकीकडे वळतील. याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार असल्याचा अंदाज अर्थ तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.




Budget 2023 New Income Tax : सध्याची कर उत्पन्न मर्यादा किती?



सध्या ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.


ज्यांचे उत्पन्न 2.50 ते 5 लाख रुपये आहे, त्यांना 5 टक्के दराने म्हणजेच 12500 रुपये कर भरावा लागतो.



प्राप्तिकराच्या नियम 87A अंतर्गत, सरकार 12,500 रुपयांची कर सवलत देते.


 करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.



ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षाही अधिक आहे, त्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही. अशा लोकांना केवळ महागाई, आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर वाढलेला ईएमआय आदीमुळे खिशावर अधिकच ताण येतो.



Budget 2023 New Income Tax : ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक सध्या कमाल 15 लाख रुपये जमा करू शकतात. ही मर्यादा 30 लाख रुपये करण्यात येणार आहे.



Budget 2023 New Income Tax : महिलांसाठी बचत योजना
महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येणार आहे.


 दोन लाखापर्यंतची रक्कम ठेवता येईल. 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.
भारतात लोकांच्या उत्पन्नानुसार कर घेतला जातो.


 परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की जगात असेही देश आहेत, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही.


यामागचे कारण काय? त्या सरकारांकडे देश चालवण्यासाठी पैसा कुठून येतो, ते जाणून घेऊयात सविस्तर..



1. संयुक्त अरब अमिराती
संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE हा आखाती प्रदेशातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असून येथील अर्थव्यवस्थेची ताकद पर्यटन आणि तेल आहे. या देशातील नागरिकांना कर भरावा लागत नाही.



2. ब्रुनेई


ब्रुनेई हा देश जगातील दक्षिण पूर्व आशियामध्ये येतो. हा देशही तेलाचा साठा असलेल्या देशांपैकी एक आहे. या इस्लामिक राज्याच्या लोकांनाही आयकर भरावा लागत नाही.


3. कुवेत


कुवेतही आखाती प्रदेशात येतो. हा तेल निर्यात करणारा मोठा देश असून या देशातील लोकांनाही आयकर भरावा लागत नाही.



4. मालदीव


मालदीवला एक लोकप्रिय पर्यटन स्थळही म्हटले जाते. भारताशिवाय इतर देशांतूनही अनेक लोक मालदीव येथे भेट देतात.



5. बहरीन


बहरीन या देशाचे नागरिक त्यांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरत नाही. .



6. कतार


कतार हा देखील देश तेल क्षेत्रातही बलाढय़ आहे. महत्त्वाचे म्हणजे तो लहान असूनही खूप श्रीमंत मानला जातो. येथील लोकही आयकर भरत नाहीत.



7. मोनाको


मोनाको हा युरोपातील लहान देश आहे. हा देश जरी लहान असला तरी तेथील नागरिकही आयकर भरत नाहीत.



8. बहामास


बहामासच्या नागरिकांनाही कसलाच आयकर भरावा लागत नाही.



9. नौरू


जगातील सर्वात लहान बेट राष्ट्र असलेल्या नौरूचे क्षेत्रफळ फक्त ८.१ चौरस मैल इतकेच असून येथील नागरिकही कर भरत नाहीत.


10. केमन बेटे


केमन बेटे उत्तर अमेरिका खंडात येतात, हे बेट पर्यटकांमध्ये लोकप्रिय असून हा देश आयकरमुक्त आहे.



11. सोमालिया


सोमालिया देशातील नागरिकांकडून कर वसूल केला जात नाही.



12. ओमान


ओमान हा आखाती देशांपैकी एक असून तेथील नागरिकांना आयकर भरावा लागत नाही. याचे मोठे कारण तेल आणि वायू क्षेत्रातील ताकद आहे.



आजचा अर्थसंकल्प 
2023-24 मध्ये


*7 लाख कर पात्र उत्पन्न 0 टॅक्स*


जर कर पात्र उत्पन्न 7 लाख पेक्षा जास्त असेल तर


3 लाख ते 6 लाख - 5%


6 लाख ते 9 लाख - 10%


9 लाख ते 12 लाख - 15% 
   असा टॅक्स असेल.

1 comment:

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...