राज्य मंत्रिमंडळ
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून राज्यपाल #रमेश_बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे.
🔸मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
🔸उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
🔸उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
🔸 छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
🔸 दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
🔸 राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
🔸 सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
🔸 हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
🔸 चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
🔸 विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
🔸 गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
🔸 गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
🔸 दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
🔸 संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
🔸 धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
🔸 सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
🔸 संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
🔸 उदय रविंद्र सामंत- उद्योग
🔸 प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
🔸 रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
🔸 अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
🔸 दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
🔸 धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
🔸 अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
🔸 शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
🔸 कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
🔸 संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
🔸 मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
🔸 अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
No comments:
Post a Comment
तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...