शिक्षक भरती - पवित्र पोर्टल

शिक्षक भरती यादी खाजगी👇👇👇 

शिक्षक भरती यादी खाजगी


%%%%%%%%%%%%%%%&%



शिक्षक भरती यादी सर्व जिल्हा परिषद👇👇👇


शिक्षक भरती यादी जिल्हा परिषद






%%%%%%%%%%%%%




शिक्षक भरती यादी सातारा👇👇👇

शिक्षक भरती यादी सातारा  








%%%%%%%%%%%%%%%%%%%





मोठी बातमी! ३२ हजार शिक्षक भरतीचं वेळापत्रक फायनल; २४ जिल्ह्यांची बिंदुनामावली अंतिम; जाणून घ्या भरतीचे ‘३’ टप्पे


खासगी अनुदानित संस्था व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जानेवारीअखेर ३२००० पदांची भरती होणार आहे. आता शाळांना रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तीन आठवड्यांची (७ नोव्हेंबरपर्यंत) मुदत देण्यात आली आहे.

खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची पदे भरताना एका पदासाठी तीन उमेदवारांना राज्य स्तरावरूनच मुलाखतीसाठी त्या संस्थेत पाठविले जाणार आहे. त्या तिघांमधून एकाची मुलाखतीद्वारे निवड करायची आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भरतीसाठी उमेदवारांना कितीही जिल्हे तथा शाळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.सोलापूर : राज्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरतीला आता प्रारंभ झाला आहे. जानेवारीअखेर ३२ हजार पदांची भरती होणार आहे. आता संस्था व जिल्हा परिषद शाळांना रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तीन आठवड्यांची (७ नोव्हेंबरपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारांकडून प्रत्येक प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत.

जिल्हा परिषदांच्या जवळपास ६३ हजार शाळांमध्ये ३० हजारांवर शिक्षक तर खासगी संस्थांमध्येही १५ हजारांवर शिक्षक कमी आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नसतानाही तब्बल साडेसहा-सात वर्षे जिल्हा परिषद शाळांचा गाडा तसाच ओढला जात होता. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी शिक्षक भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
आता जिल्हा परिषद शाळांमधील अंदाजे २३ हजार आणि खासगी अनुदानित संस्थांमधील सात ते नऊ हजार पदांची भरती सुरु झाली आहे. १६ ऑक्टोबरपासून संस्थांसह ज्या जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम झाली, त्यांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्याचे आदेश निघाले आहेत. तीन आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. दरम्यान, सध्या राज्यातील २४ जिल्ह्यांची बिंदुनामावली अंतिम झाली असून आणखी दहा जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून पडताळली जात आहे.

‘या’ जिल्ह्यांची बिंदुनामावली पडताळणी
सोलापूर, लातूर, सातारा, जालना, अकोला, यवतमाळ, वाशिम, पुणे या जिल्ह्यांची बिंदुनामावली सध्या मागासवर्गीय कक्षाकडून पडताळली जात आहे. काही शिक्षकांच्या मान्यता, नेमणूक कधीपासून, कोणत्या प्रवर्गातून झाली या बाबी तपासल्या जात आहेत. काही प्रकरणातील अर्धवट कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जात आहे. आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल.

भरती प्रक्रियेचे टप्पे...
- १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत ‘पवित्र’वर जाहिराती अपलोड करणे
- १५ नोव्हेंबरनंतर तीन आठवड्यात उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरून देणे
- डिसेंबरअखेर ते ३० जानेवारीपर्यंत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नेमणुका
खासगी संस्थांना मुलाखतीचे बंधन
खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची पदे भरताना एका पदासाठी तीन उमेदवारांना राज्य स्तरावरूनच मुलाखतीसाठी त्या संस्थेत पाठविले जाणार आहे. त्या तिघांमधून एकाची मुलाखतीद्वारे निवड करायची आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भरतीसाठी उमेदवारांना कितीही जिल्हे तथा शाळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.







रजिस्ट्रेशन कसे करावे














उमेदवारांना सूचना









सादर करावयाची कागदपत्रे 












शिक्षक भरती

दहा जिल्हा परिषदांच्या शिक्षक विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली असून उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदुनामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.

त्यामुळे सहा वर्षांच्या भरतीची प्रतीक्षा आता संपणार असून ५ सप्टेंबरपूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे 'पवित्र' पोर्टल उघडले जाणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास ६२ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावरून भरली जाणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे. सुरवातीला प्रोफाईल तयार करून घ्यावे लागेल. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांना रिक्तपदांची जाहिरात 'पवित्र'वर अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार त्या खासगी संस्थेत पाठविले जातील. त्यांची निवड मुलाखतीतून होणार आहे.



आता तातडीने बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली जात आहे. पाच-सहा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर पवित्र पोर्टल सुरू होईल, अशी माहिती शिक्षण आयुक्तालयातील सूत्रांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

अंदाजे २३ हजार जागांची भरती

राज्यात मागे २०१७मध्ये शिक्षक भरती झाली होती, त्यानंतर टीईटी, टेट होऊनही भरती झाली नाही. विद्यमान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा परिषदांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचेही शिक्षकांअभावी हाल होवू नये या हेतूने शिक्षक भरतीची घोषणा केली. त्यानुसार युद्धपातळीवर कार्यवाही सुरु आहे. नुकत्याच झालेल्या संचमान्यतेनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्तपदांचाही समावेश आहे.




TAIT नंतर पुढे काय?


*राज्यातील संवर्ग व जिल्हानिहाय रिक्त जागा*👇👇👇


PDF डाउनलोड करा...


*शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :-*

*TAIT 2023*


*01) मो नं*

*02) ईमेल आयडी*

*03) सही, पत्ता, जन्मतारीख*

*04) ओळख पत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)*

*05) निवड यादीतील- अनु क्रमांक*

*06) उमेदवाराच्या अर्जाची स्वप्रमाणित प्रत*

*07) जन्म तारखेचा (शाळा सोडल्याचा) दाखला*

*08) एस एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र*

*09) एच एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र*

*10) पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र*

*11) पदव्युत्तर गुणपत्रक व प्रमाणपत्र*

*12) डीएड गुणपत्रक व प्रमाणपत्र*

*13) बीएड गुणपत्रक व प्रमाणपत्र*

*14) टिईटी / सिटिईटी गुण व प्रमाणपत्र*

*15) Tait परीक्षा गुण व प्रमाणपत्र*

*16) जात प्रमाणपत्र (Cast certificate)*

*17) जात वैधता प्रमाणपत्र (Validity)*

*18) अधिवास प्रमाणपत्र (Domocile)*

*19) लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र/प्रमाणपत्र*

*20) MS-CIT प्रमाणपत्र*

*21) नावात बदल असल्यास (Marriage certificate/Affidavit/Gazette.)*

*22) महिला आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास*

*23) नॉन क्रिमीलिअर लागू असल्यास*

*24) पेसा क्षेत्रातील असल्यास (अज फक्त) मुळ अधिवास ठिकाण प्रमाणपत्र*

*25) उमेदवार - खेळाडू, अपंग, प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रस्थ, माजी सैनिक, अंशकालीन, लागू असल्यास प्रमाणपत्र.*





शिक्षक भरतीची प्रक्रिया नेमकी कशी  असणार... सविस्तर समजून घ्या...





(D) निवडीची कार्यपद्धती
१) उमेदवाराने पवित्र प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे [जात प्रवर्ग, समांतर आरक्षण, वय, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता इ.] ज्या संस्थेमधील रिक्त पदावर अर्ज करण्यास उमेदवार पात्र ठरत असेल त्या व्यवस्थापननिहाय संस्थांची पदनिहाय प्राधान्यक्रम भरण्यासाठीची यादी संबंधित उमेदवारास त्यांचे log in वर Preferances Generate करून Download केल्यानंतर दिसेल, यामधून उमेदवाराने त्यांच्या पसंतीच्या संस्थेतील पदे निवडून योग्य ते प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत. प्राधान्यक्रम देताना तो विचारपूर्वक देणे आवश्यक आहे. प्राधान्यक्रम अंतिम (Lock Preferances) केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
२) पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांनी स्वतःची माहिती स्वप्रमाणित केलेली आहे, सदर माहितीच्या आधारे उमेदवारास पात्र असणारी पदे प्राधान्यक्रम भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. उमेदवाराने स्वतः या पदांसाठी पात्र असल्याची खात्री करून संबंधित पदांचेच प्राधान्यक्रम भरावेत.
5
३) पवित्र प्रणालीअंतर्गत पदभरतीसाठी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्र. २९५६/२०१९ व अन्य याचिकांवरील निर्णयांच्या अधिन राहून प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा देण्यात येत आहे. याबाबत मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. ४) प्राधान्यक्रम भरण्याबाबत संकेतस्थळावर मार्गदर्शक व्हिडीओ तसेच वारंवार विचारले जाणारे प्रश्न
(FAQs) यांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच विभागस्तरीय (विभागीय शिक्षण उपसंचालक) / जिल्हास्तरीय (शिक्षणाधिकारी प्राथमिक) पवित्र मदत केंद्रावर मार्गदर्शन घेता येईल. ५) उमेदवार त्याच्या बुद्धिमत्ता व अभियोग्यता (TAIT) च्या परीक्षेतील प्राप्त गुण, जातीचा प्रवर्ग, समांतर आरक्षण, विषय, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता इ. च्या आधारे ज्या प्राधान्यक्रमावर जागा उपलब्ध असेल त्या जागेसाठी पात्र समजला जाणार आहे. उमेदवार प्राधान्यक्रमानुसार ज्या जागेसाठी नियुक्ती / मुलाखतीसाठी पात्र समजला जाईल. त्यानंतर त्याचे उर्वरित प्राधान्यक्रम विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे उमदेवारांनी त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, उपलब्ध जागा, (TAIT) च्या परीक्षेतील प्राप्त गुण इ. बाबीचा अभ्यास करुन योग्य ते प्राधान्यक्रम नमूद करावेत.
६) प्राधान्यक्रम दोन भागांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवाराने प्रथम नागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था (उदा. जिल्हा परिषद, मनपा, नप इ.) यातील पदे व ज्या खाजगी संस्थातील मुलाखतीशिवाय वृध्दीमता व अभियोग्यता (TAIT) परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे थेट नियुक्ती करावयाच्या पदांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देण्यात यावा. तसेच दुसऱ्या भागात खाजगी संस्थातील जी पढे मुलाखतीनंतर पात्र ठरणार आहेत अशा पदांसाठी प्राधान्यक्रम देण्यात यावेत.
७) जो उमेदवार मुलाखतीशिवाय गुणवत्तेच्या आधारे थेट नियुक्ती करावयाच्या पदासाठी पात्र ठरेल त्याचा मुलाखतीसहीत नियुक्ती करावयाच्या खाजगी संस्थेमधील पदाच्या पात्रतेसाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवाराने प्राधान्यक्रम विचारपूर्वक द्यावेत.
८) अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील (TAIT) गुणांच्या आधारे इतर अटी व शर्ती पूर्ण करणारे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट निवडीस पात्र असणार आहेत. यासाठी मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच ज्या संस्थांनी उमेदवार निवडीसाठी मुलाखतीशिवाय असा पर्याय निवडला असेल त्यांना देखील १:१ या प्रमाणात नियुक्तीसाठी उमेदवार पाठविले जाणार आहेत..
९) मुलाखतीशिवाय भरती प्रक्रियेसाठी १:१ या प्रमाणात उमेदवार पात्र ठरवले जाणार आहेत. पात्र ठरलेले उमेदवार विहित कालावधीत संबंधित पदावर कोणत्याही कारणांमुळे रुजू न होणे, कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहणारी पदे भरण्याबाबत या भरतीप्रक्रियेत विचार केला जाणार नाही. १०) मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुलाखतीसहीत नियुक्ती करावयाच्या खाजगी संस्थेमधील
पदांसाठी १:१० या प्रमाणात मुलाखतीसाठी पात्र ठरविले जाणार आहेत. खाजगी व्यवस्थापनाच्या
शाळांकरिता प्रत्येक रिक्त जागेकरिता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह मुलाखतीसाठी १:१० या प्रमाणात उमेदवाराचा गुणानुक्रम प्राधान्यक्रम, माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदुनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची मुलाखतीसाठी निवडसूची संस्थेस उपलब्ध करून देण्यात येईल.


११) खाजगी शैक्षणिक संस्थेतील पदभरतीसाठी उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार गुण, प्राधान्यक्रम आरक्षण डू. पात्रता विचारात घेवून जास्तीत जास्त १० पदांकरिता मुलाखतीसाठी उमेदवार निवडला जाणार आहे. या सर्व संस्थांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीचा कालावधी स्वतंत्रपणे देण्यात येईल. संपूर्ण राज्यभरातील सर्व खाजगी संस्थातील मुलाखती ठरावीक कालावधीमध्ये घेण्यात येतील. मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणी देण्यासाठी उमेदवारास पुरेसा कालावधी मिळेल याची
दक्षता घेतली जाईल.
१२) खाजगी शैक्षणिक संस्थेतील मुलाखतीसह पदभरतीबाबत अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेतील गुण मुलाखतीच्या वेळी विचारात घेतले जाणार नाहीत. उमेदवाराची अंतिम निवड ही मुलाखत व अध्यापन कौशल्य यातील गुणांच्या आधारे होणार आहे. उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य ही एकूण ३० गुणांची असेल. तथापि मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांचे अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेतील गुणही सर्व संस्थांना कळवण्यात येतील व मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे संस्थेकडे प्राप्त झालेल्या यादीतील (TAIT) परीक्षेतील सर्वोतम गुण नसणाऱ्या उमेदवारास निवडावयाचे झाल्यास शाळा समितीस लिखित कारणे द्यावी लागतील. संस्थेकडून संबंधित उमेदवारांची मुलाखत घेवून व अध्यापन कौशल्य तपासून त्याआधारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची संस्था रिक्त पदावर निवड करणार आहे. मुलाखतीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची संस्था गुणानुक्रमे यादी तयार करुन संकेतस्थळावर विहित मुदतीत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करेल.
१३) मुलाखतीसह भरतीप्रक्रियेसाठी १:१० प्रमाणात उमेदवार पात्र ठरवले जाणार आहेत. यामधील पात्र ठरलेला उमेदवार विहित कालावधीमध्ये कोणत्याही कारणांमुळे रुजू न होणे, कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या पदावर संस्था गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची निवड करेल.
१४) संस्थेने निवड केलेल्या उमेदवारास ७ कार्यालयीन दिवसांमध्ये हजर व्हावे लागेल, उक्त कालावधीमध्ये उमेदवार हजर न झाल्यास संस्था गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची निवड करेल. निवडलेल्या प्रत्येक
उमेदवारास हजर होण्यासाठी कमाल ७ कार्यालयीन दिवसांची मर्यादा असेल. १५) प्रशासकीय कारणास्तव अंतिम निवडीपूर्वी पदसंख्येत बदल होवू शकतो.
१६) उमेदवारांना पदभरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क / फी आकारली जाणार नाही.
१७) प्रथम मुलाखतीशिवाय (स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी संस्था) संस्थासाठी निवड प्रक्रिया राबविली जाणार असून त्यात निवड झालेल्या उमेदवारांचा मुलाखतीद्वारे निवड करणाया खाजगी संस्थांच्या शाळांमधील पदभरतीसाठी विचार केला जाणार नाही. या निवडलेल्या उमेदवारांना वगळून इतर उमेदवारांसाठी खाजगी संस्थेकडील पदभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या बाबींचा विचार करूनच उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम द्यावेत.









१८) उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही. ज्या ज्या पदांसाठी पात्र असेल त्या सर्व
संस्था/पदांसाठी त्याच्या पात्रतेनुसार उमेदवारास प्राधान्यक्रम देता येतील.
१९) उर्दू माध्यमाच्या जागासाठी अनु. जाती / एसईबीसी या प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी शासन आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
२०) उमेदवाराने एकुण पात्र पदांपैकी ज्या पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदविलेले आहेत, फक्त त्याच पदांसाठी त्याचा विचार केला जाईल, पात्र असूनही कांही पदांसाठी प्राधान्यक्रम न दिल्यास उमेदवाराचा त्या पदासाठी विचार होणार नाही.
२१) अनुसूचित जमाती ( पेसा क्षेत्र) या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम देताना अनूसुचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांचे आधिवास पेसा क्षेत्रांतर्गत असेल आणि उमेदवाराने स्वतः त्या स्थानिक ठिकाणाचे रहिवाशी असल्याची खात्री करून प्राधान्यक्रम देण्यात यावा. उमेदवारांनी प्राधान्यक्रम चुकीचा दिल्यास आणि निवडीनंतर अपात्र ठरल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची असेल.
२२) अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेत (TAIT) समान गुण असलेल्या उमेदवारांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडील दि. २ डिसेंबर २०१७ रोजीच्या शासन पूरकपत्रानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचा समावेश करण्यात आला असून ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील, अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येईल -
(a) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.
b) समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अ.क्र. १ नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
c) वरील अनु. क्र. a व b या दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता ( पदव्युत्तर पदवीधर, पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे) धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.
d) वरील अ.क्र. a, b व c या तिन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, सदर पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

2 comments:

  1. ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यावर कृपया आम्हाला कळवावे

    ReplyDelete
  2. स्वप्रमाणपत्र भरताना सर्व्हर डाऊन होत आहे .

    ReplyDelete

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...